pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीगव्हाण येथे भव्य सर्व रोगनिदान शिबीर व रक्तदान शिबीर

0 3 8 6 5 4

जालना/प्रतिनिधी,दि.19

भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २१ सप्टेंबर रोजी मौजे मोतीगव्हाण ता.जि.जालना येथे सर्व रोगनिदान शिबीर व रक्तदान शिबिर तसेच विविध विकास कामांचे लोकार्पण सकाळी 9.00 ते सायं 5.00 पर्यंत आयोजित करण्यात आले असून याचे उदघाटन भारत देशाचे माजी मंत्री जालना जिल्हा लोकनेते श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

यावेळी माजी आ.कैलासजी गोरंटयाल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक आण्णा पांगारकर, सतीश जाधव, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, विजय कामड, विमलताई आगलावे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.शुभांगीताई देशपांडे, भाजपा युवानेते अक्षय गोरंटयाल, महानगर ग्रामीण मंडळ अध्यक्ष संजय डोंगरे, नवीन जालना मंडळ अध्यक्ष सुनील खरे, जुना जालना मंडळ अध्यक्ष महेश निकम, पूर्व जालना मंडळ अध्यक्ष अमोल धानुरे, महिला मोर्चा ग्रामीण मंडळ अध्यक्षा सौ.सुषमा खरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या शिबिरा सोबतच यावेळी गावांमध्ये स्वच्छता अभियान, एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षारोपण, विविध पूर्ण झालेली विकास कामांचे लोकार्पण तसेच विविध तज्ञ डॉक्टर, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, एमडी मेडिसिन, त्वचारोग तज्ञ, हाडांचे तज्ञ व नेत्र तज्ञ डॉक्टर सह अनेक तज्ञ डॉक्टरांची यावेळी उपस्थिती राहणार असून यावेळी नागरिकांची त्यांच्याकडून तपासणी होणार आहे. तसेच भारतीय जनता पार्टी शाखा मोतीगव्हाण च्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. तरी परिसर व भागातील नागरिकांनी या सर्व रोगनिदान शिबिराचा व रक्तदान शिबिराचा लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन मोतीगव्हाण चे सरपंच तथा आयोजक विजय मोहिते पाटील यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे