आम्ही वारकरी परिवाराकडून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळ्यास भाविक भक्तांनी सहभागी व्हावे- हभप राम महाराज पांगरगेकर

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.4
नांदेड पासुन जवळच असलेल्या मारताळा ता.लोहा येथे
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळ्यात गुरूवर्य हभप.श्री.श्री.नराशाम महाराज येवती ता.मुखेड,गुरूवर्य तेलंगणा भूषण नारायण महाराज माधापुरीकर,गुरुवर्य बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज,गुरुवर्य प्रयागगिरी महाराज,गुरुवर्य ब्रम्हानंद सरस्वती महाराज, गुरुवर्य मधुसूदनजी महाराज कापशीकर यांच्या उपस्थितीत
सांगता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचं हे सातवं वर्ष आहे सन २०१८ मध्ये अवघ्या ४२ साधकांना सोबत घेऊन सुरू केलेला हा प्रवास या वर्षी ९५४५ साधका पर्यंत पोहोचला आहे.
आम्ही वारकरी परिवाराने “घर तिथे ज्ञानेश्वरी! घरोघरी ज्ञानेश्वरी” हे ब्रीद मनाशी बाळगुन गेल्या सात वर्षात नांदेडसह महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी मोफत आणि घरपोच पोहोचवली आहे. आम्ही वारकरी परिवाराचा संकल्प होता माऊलीच्या ज्ञानेश्वरी मध्ये “जेवढ्या ओव्या आहेत तेवढे साधक पारायनासाठी बसवणे.” अर्थात माऊलीच्या ज्ञानेश्वरीत ९०३३ ओव्या आहेत तेवढे साधक पारायनास बसवणे. हा संकल्प यावर्षी सिद्धीस गेलेला आहे.आम्ही वारकरी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर यांनी माऊलीच्या ज्ञानेश्वरीचे पारायण करण्याची एक आगळीवेगळी संकल्पना सर्वांसमोर ठेवली. साधकांनी पवित्र अशा श्रावण महिन्यात आपल्याच घरी आपल्या सोयीच्या वेळेनुसार ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे दररोज ठराविक ओव्यांचे पारायण करायचे आणि सांगता मात्र सर्व साधकांनी एकत्र येऊन साजरी करायची. जे साधक पारायनासाठी बसलेले आहेत त्या सर्व साधकांना एक दिवस एकत्र घेऊन सांगता सोहळा साजरा करण्याचे काम गेल्या सहा वर्षापासून आम्ही वारकरी परिवार करत आहे. यावर्षीचे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता दिनांक: ९ सप्टेंबर २०२४ अर्थात भाद्रपद षष्ठी वार: सोमवार या दिवशी वैकुंठवासी उद्धवराव पाटील कौडगावकर यांचे मामा मंगल कार्यालय मारतळा ता.लोहा जि. नांदेड येथे संपन्न होणार आहे. या पारायनाच्या संकल्पपूर्तीसाठी आम्ही वारकरी परिवारातील लहान थोरापासून सर्वांनी रात्रंदिवस परिश्रम घेतलेले आहेत. विशेष म्हणजे आम्ही वारकरी परिवाराचे मार्गदर्शक रावसाहेब पा. शिराळे दतराम पा. येडके रामजी पा.शिंदे,प्रभाकर पा.पूय्यड,दत्तरामजी गोरठेकर, नारायण मामा समदुरे संस्थेचे संस्थापक सचिव प्रेममूर्ती व्यंकट महाराज जाधव माळकौठेकर संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य आणि विशेष करून पारायण नाव नोंदणी करणे, याद्या बनवणे, ग्रुप मध्ये प्रत्येकाला ऍड करणे, प्रत्येकाला कॉल मेसेज करणे यासाठी अनेक नव तरुणांनी रात्रंदिवस परिश्रम करून हा संकल्प पूर्णत्वास नेलेला आहे. सदर कार्यक्रमास सर्व सदभक्तांनी उपस्थित रहावे असे आव्हान आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र यांच्या तर्फे करण्यात आले.
असे प्रसिध्दी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले