pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदी वैभव उगले – आ. गोरंट्याल

0 1 7 4 0 8
जालना/प्रतिनिधी,दि.16
जालना शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदी वैभव उगले यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा आ. कैलास गोरंट्याल यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केली.
जालना नगर परीषदेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटिची स्थापना करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी शहर जिल्हा कार्यकारणीला मान्यता देत जालना शहर काँग्रेस ब्लॉक कमिटिच्या अध्यक्षपदी वैभव उगले यांची नियुक्ती केली आहे.
आ. कैलास गोरंट्याल यांनी सदरील पदी श्री उगले यांची नियुक्ती करण्यासंदर्भात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमुद यांना सुचित केल्यामुळे प्रदेश काँग्रेस कडून अधिकृतरीत्या नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रकार परीषदेत शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमुद यांनी सांगीतले.
आ. कैलास गोरंट्याल यांनी नवनियुक्त शहराध्यक्ष वैभव उगले यांच्या सघंटत्माक कार्याचा गौरव उल्लेख करून आगामी काळात जालना शहरात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबुत होण्यास मदत होईल असे सांगीतले. यावेळी श्री उगले यांचा आ. कैलास गोरंट्याल, शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शेख महेमूद यांनी शाल, पुष्पहार घालुन सत्कार केला. याप्रसंगी माजी गटनेते गणेश राऊत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदाताई पवार, शेख इब्राहिम, माजी नगरसेवक महाविर ढक्का, जावेद अली, गणेश चांदोडे, बाबासाहेब सोनवणे, प्रमोद आल्हाट, जार्ज उगले आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे