बरडशेवाळा आरोग्य केंद्रातील रिक्त पदासह शवविच्छेदन केंद्र सुरु करा – सवीताताई निमडगे

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.9
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कार्यक्षेत्रासह आजु बाजुच्या चाळीस गावाहुन अधिक लोकसंख्येसह अती संवेदनशील असलेल्या बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची विस वर्षापुर्वी टोलेजंग इमारत बांधण्यात आली.आमदार जवळगावकर यांच्या मातोश्री जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आरोग्य केंद्र आकर्षण केले आहे.मागील एक वर्षापुर्वी अनेक वर्षाचा अनुभव असलेले दोघेही वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.जी. भिसे व डाक्टर के.सी.बरगे कार्यरत झाल्यापासुन कार्यक्षेत्रात रुंग्णाना सोयीचे ठरत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.कामामुळे जिल्हात पुरस्कार प्राप्त झाला.पंरतु सध्या मागील काही काळापासुन आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त असल्याने कमी कर्मचा-यावर काम करत असताना अनेक अडचणी निर्माण येत आहेत. तर प्राथमिक आरोग्य केंद्र ईमारत बांधकाम केले असताना त्यावेळी बांधकाम केलेले शवविच्छेदन केंद्र अद्याप सुरु झाले नसल्याने शवविच्छेदन करण्यासाठी हदगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात जाणून त्याठिकाणी नेहमीच अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने कार्यक्षेत्रातून रोष व्यक्त होत आहे. याठिकाणी आता अनुभवी वैद्यकीय अधिकारी असल्याने बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदासह शवविच्छेदन केंद्र सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता सवीताताई विनोद निमडगे पळसेकर यांनी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह जिल्हाधिकारी,सिईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
कमी कर्मचा-यावर अधिकारी कर्मचारीवर्गाचे काम कौतुकास्पद आहे.याठिकाणी रिक्त असलेले पदे भरण्यासाठी संबधित विभागाला सुचना दिल्या असुन लवकरच पदे भरण्यात येतील.आरोग्य केंद्रातील विविध काम सुरु असून आठ दिवसात शवविच्छेदन केंद्राचे काम पूर्ण होईल अश्या सुचना दिल्या आहेत.
आमदार माधवराव पाटील जवळगावकर