pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर व पायात भिंगरी घालून त्रिसुत्रीनुसार काम करा. – प्रा. मनोहर धोंडे

0 1 1 8 1 5

 

 

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना ही वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध समस्यांना न्याय देणारी सर्वात प्रभावी व आक्रमक संघटना असून वीरशैव लिंगायत समाजाचे अनेक प्रश्न शिवा संघटनेने मार्गी लावले आहेत. भविष्यात सर्वांनी एकत्र येऊन संघटीत होउन काम करण्याची गरज असून शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोक्यावर बर्फ,जिभेवर साखर, पायात भिंगरी घालून शिवा संघटनेच्या संघटन, प्रबोधन, परिवर्तन या त्रिसूत्री नुसार कार्य करावे असे प्रतिपादन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी वाशी येथे केले.

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या नवी मुंबई जिल्हा शाखेत‌र्फे विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे दुपारी 3 ते 6 या वेळेत वीरशैव लिंगायत समाजातील जाती उपजातीतील इच्छुक वर वधूसाठी वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर महात्मा बसवेश्वर यांची 892 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. मनोहर धोंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रा. मनोहर धोंडे यांनी उपस्थित सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंतर शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेची स्थापना 28 जानेवारी 1996 साली झाली असल्याचे सांगत विविध समस्यांना संकटाना सामोरे जात शिवा संघटनेने समाजाचे विविध प्रश्न कसे सोडविले याची माहिती दिली व सर्व पदाधिकाऱ्यांना भविष्यातील नवीन आव्हाने पेलण्यासाठी, संघर्ष करून विविध मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि पायात भिंगरी बांधून संघटन, प्रबोधन,परिवर्तन या त्रिसुत्री नुसार काम करण्याचे आवाहन प्रा. मनोहर धोंडे यांनी शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी महापौर शशिकांत बिराजदार यांनीही आपल्या जीवनातील चांगले वाईट अनुभव सांगत वीरशैव लिंगायत समाजातील नागरिकांनी आपापसातील मतभेद विसरून , एकमेकांचे पाय खेचण्याची प्रवृत्ती सोडून सर्वांनी एकत्र येत, एकमेकांना साथ देऊन प्रगती करण्याचे आवाहन केले. गुरुवर्य प्रभुदेव शिवाचार्य महाराज माढेकर यांनीही धर्म व धर्माचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. शिवा संघटना ही उत्तम संघटना असून धर्म रक्षणाचे कार्य उत्तमरित्या करीत असल्याचे त्यांनी सांगितले.व धर्मासाठी, देश रक्षणासाठी एकत्र या असे आवाहन केले.राष्ट्रीय उपाध्यक्ष वाय बी सोनटक्के यांनी शिवा संघटनेचे महत्व विषद करत आठवड्यातून एकदा तरी कार्यकर्त्यांच्या, समाजातील नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधावा, त्यांच्या अडी अडचणी समजून घ्याव्यात असे आवाहन केले.राज्य सरचिटणीस रुपेश होनराव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिवा संघटनेच्या कार्याची माहिती दिली. व समाजात चाललेले विविध अफ़वा, आमिष प्रलोभने यांना बळी न पडता आपासातील मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रा. मनोहर धोंडे, शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ . वाय. बी. सोनटक्के, महाराष्ट्र राज्य सरचिरणीस रुपेश होनराव, राज्य संघटक नारायण कंकणवाडी, ठाणे महानगर पालिका उपायुक्त गजानन गोदेपूरे ,नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी महापौर शशिकांत बिराजदार,श्री.नागेश्वर मंदिर ट्रस्ट मुंबई गोल देऊळचे अध्यक्ष योगेश होनराव, शरण संकुल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जी. बी रामलिंगैय्या, ठाणे जिल्हाध्यक्ष शिवा बिराजदार, रायगड जिल्हाध्यक्ष विनायक म्हमाने,सोशल मीडिया रायगड जिल्हाध्यक्ष विठ्ठल ममताबादे,उद्योजक राजेंद्र सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता धमाने आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. वधूवर मेळावा तसेच महात्मा बसवेश्वर जयंती कार्यक्रम असे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी एकाच ठिकाणी विष्णुदास भावे नाटयगृह वाशी नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण विभागीय अध्यक्ष उध्दव खराडे,नवी मुंबई जिल्हाध्यक्ष देवेंद्र कोराळे, नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस रमाकांत पाटील, नवी मुंबई जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष वैशालीताई मेनकुदळे,कोपरखैरणे अध्यक्ष अशोक बिराजदार, पनवेल तालुकाध्यक्ष दत्ता पाटील आदी शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उद्धव खराडे, रुपेश होनराव यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 5