भारतीय जनता पार्टी जे एन पी टी टाउनशिप अध्यक्ष पदी डी.पी. सोनावणे यांची नियुक्ती.
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी दिल्या शुभेच्छा.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22
जे.एन.पी. टी बहुउदेशिय सभागृह, टावूनशिप, उरण येथे भारतीय जनता पार्टी उरण आयोजित प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्ष प्रवेश सोहळा आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. त्या वेळी सुप्रसिद्ध कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते डी पी सोनावणे यांची जे एन पी टी टाउनशिप येथील भारतीय जनता पार्टी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी मा. श्री. प्रशांत ठाकूर आमदार पनवेल विधानसभा,महेशशेठ बालदी आमदार उरण विधानसभा,अविनाश कोळी जिल्हाअध्यक्ष उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी,उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, नंदू पटवर्धन , कामगार नेते सुरेश पाटील, वाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुधीर घरत, चंद्रकांत घरत, जितेंद्र घरत, महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, नगराध्यक्ष सायली म्हात्रे आदी पदाधिकारी मान्यवर उपस्तिथ होते.डी पी सोनावणे यांचा कामगार चळवळीत सक्रिय सहभाग असून संप आंदोलने, बैठका मध्ये ते नेहमी अग्रेसर असतात. भारतीय मजदूर संघाचे ते संघटन मंत्री आहेत. डी पी सोनावणे यांनी आजपर्यंत अनेक गोर गरिबांना, कामगारांना, महिलांना आपल्या कार्यातून त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.मीतभाषी, प्रेमळ, शांत स्वभाव असल्यामुळे कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. या सर्व कार्याची दखल घेत डी. पी. सोनावणे यांची जेएनपीटी भाजप शाखाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत असून विविध प्रतिष्टीत मान्यवरांनी भेटून तर अनेक चाहत्यांनी, नागरिकांनी त्यांना व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.