निवडणूकीच्या पाश्वभुमीवर परीसरात ठिक ठिकाणी पथ संचलन

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.15
आगामी काळात सण उत्सवासह लोकसभा निवडणूकीसह सर्व निवडणूका शांततेत पार पडाव्यात सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी मनाठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकीच्या पाश्वभुमीवर शुक्रवार पंधरा मार्च रोजी मनाठा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मनाठा बामणी फाटा सह परिसरात ठिक ठिकाणी पोलीस पथकांचे पथसंचलन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. मनाठा पोलीस कार्यक्षेत्रात कुठेही अनुचित प्रकार घडू नये कुठल्याही परीस्थीतीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची सर्वानी काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले .
यावेळी उपनिरीक्षक कांबळे , बिट जमादार श्यामजी वडजे, जमादार दत्तात्रय गिरी,जमादार कृष्णा यादव ,पोलीस कर्मचारी नागरगोजे , दत्ता वडजे, नरवाडे वागतकर ,महिला पोलिस कर्मचारी, होमगार्ड तसेच त्यांचे सर्व सहकारी व सीआरपी जवान मोठ्या संख्येने पथ संचलनात सहभागी होते .