pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिव्यांगाच्या बैठकितील प्रश्न पंधरा दिवसांत निर्णय नाही झाल्यास तहसिलदार दालनात स्वईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत आंदोलन करणार – चंपतराव डाकोरे

0 4 1 0 2 9
[sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/ प्रतिनिधी,दि.21

नांदेडचे जिल्हाधिकारी दिव्यांगाच्या प्रश्नांसाठी वेळोवेळा बैठका व एक सुनावणी तील प्रोसिडींगमधील प्रश्नांची निवेदन दिल्यापासून पंधरा दिवसांत निर्णय
नाहि झाल्यास नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार दालनात दिव्यागाना हक्क द्यावा? हक्क देता येत नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत तहसिलदार साहेबांना कोणतेहि पुर्वसुचना न देता तहसिलदार दालनात धरने आंदोलन करनार असल्याचे निवेदन दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष यांच्या शिष्टमंडळाने मुखेड, हदगाव,किंनवट,ऊमरी,तालुक्यातील पदाधिकारी यांनी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व अनेक तालुक्यात निवेदन देणे चालु आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे नांदेड चे तत्कालीन जिल्हा धिकार मा.अभिजित राऊत सरांनी सात वेळा बैठका एका वेळी सुनावणी संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटने सोबत बैठका घेऊन आदेश, निर्देश व सुनावणी बदल अहवाल पाठविण्याचे अनेक वेळा निर्देश देऊन अद्याप त्यांच्या आदेशाची दखल घेतली नाही.
संघटनेच्या वतीने अनेक निवेदन भेटि घेतल्यामुळे सध्याचे जिल्हाधिकारी मा.राहुल कर्डिले साहेब दिव्यांगाच्या प्रश्नाबदल दि.१८ मार्च व. दि.९जुन, व डिसे.२०२५ व दि.२० जाने. २०२६ बैठक घेऊन त्यांची कनिष्ठ अधिकारी साधे ऊतर किंव्हा बैठकीतील इतिवृतातील प्रश्नाची दखल कनिष्ठ अधिकारी वरीष्ठ अधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या दोषि अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदा व दिव्यांग कायद्याप्रमाणे योग्य ते कार्यवाही का होत नाही? नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग, वृध्द, निराधाराना न्याय हक्कासाठी ई.स. २०२२ पासुन नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी साहेब,जिल्हाधिकारी नांदेड, सहित साठ निवेदने, अनेक वेळा मोर्चे, धरने,स्वईच्छा मरण्याची परवानगी बे.मुध्दत धरने, मतदान कार्ड परत घ्या, वरीष्ठाचे आदेश कनिष्ठ पाळत नसतील तर वरीष्ठ कनिष्ठावर योग ती कार्यवाही करत नसल्यामुळे वरीष्ठावर दप्तर दिरंगाई कायदा व दिव्यांचा ना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या वरीष्ठावर कार्यवाही करावी म्हणून सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने पोलिस स्टेशनमध्ये मोर्चाद्वारे गुन्हा नोंद करण्यात यावा म्हणून पोलिस स्टेशन नांदेड आंदोलन करून हि दिव्यांगाना हक्क मिळत नसेल आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे दिव्यांगाना नाईलाजाने आंदोलन तहसिलदार दालनात दिव्यांगाना हक्क द्यावा नसेल तर जंगली प्राण्यांप्रमाणे जिवन जगने शक्य नसल्यामुळे दिव्यांगाना स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत तहसिलदार दालनात आंदोलन करण्याचे निवेदन देणे चालु आहे.

कृपया मा.तहसिलदार, गटविकास अधिकारी साहेब निवेदना दिलेल्या पासुन पंधरा दिवसांत न निर्णय नाही घेतल्यास नाईलाजाने दिव्यांगाना आपल्या कार्यालयात टेबलसमोर दिव्यांगाना न्याय हक्क द्यावा नसेल तर स्व इच्छा मरणाची परवानगी मिळेपर्यंत बे मुध्दत धराने आंदोलन कोणतीही पुर्वसुचना न देता करण्यात येईल त्यात अनुचित प्रकार घडला तर त्यांची जबाबदारी प्रशासनाची राहिलं.

असे निवेदन दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली, मुखेड, हदगाव,ऊमरी किनवट तालुक्यात देण्यात आले अनेक तालुक्यांमध्ये देण्यात येणार आहे.
निवेदनावर मुखेड ता.अध्यक्ष मगदुम शेख ऊंद्रिकर,शिवहार घोडके , गणपत गोड, मानसिंग वडजे, हदगाव ता. अध्यक्ष नामदेव बोडके,ऊमरी ता अध्यक्ष गजानन वहिंदे, किनवट ता सचिव शेख शबिरसाब, गजानन कोतापेलीवार, हनुमंत घोटेकर इस्माईल शेख, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
असे प्रसिध्दी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोहरराव येरपुरवार यांनी दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 2 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे