महाराष्ट्र

जालना जिल्ह्यातील क्रीडा प्रबोधणीसाठी जिल्ह्यातील शिक्षक आले धावून,प्रत्येक शिक्षक देणार 1000 रु.

जालना/प्रतिनिधी:दि.19

जिल्हा परिषद व्दारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता क्रिडा प्रबोधनी हा निवासी उपक्रम राबवत आहे. या उपक्रमासाठी फंड कमी पडत आहे. जिल्ह्यातील शिक्षक त्यांच्या या विद्यार्थ्यांसाठी मदतीला धावून आले आहेत. प्रशासनाच्या आवाहन पत्रानुसार जानेवारी २०२१ च्या वेतनातूनप्रति शिक्षक १००० रु देणार आहेत. जिल्हा परिषद शेष फंडातून व मानव विकास कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण जिल्हा योजनेतून जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतील ८ ते १४ वयोगटातील पन्नास मुले व पन्नास मुलींसाठी निवासी क्रिडा प्रबोधनी १७ जून २०१ ९ पासून जिल्हा परिषद जालना येथे सुरू करण्यात आलेले असून तो प्रयोगत्वावर राबवला जात आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकत असलेल्या मुला- मुलींना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडाविषयक नेपुण्य दाखवण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी या हेतूने निवासी क्रीडा प्रबोधिनी सुरुवात करण्यात आली आहे . मानव विकास अंतर्गत उपलब्ध फंडातून जिल्हा परिषद मुलाची येथे निवासी क्रीडा प्रबोधिनी करिता इमारत बांधकाम प्रगतिपथावर असून माहे जानेवारी २०२१ अखेर इमारत पूर्ण होणार आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून इमारत बांधकामासाठी निधी मंजर असून मुलाच्या राहण्यासाठी, जेवणाची व्यवस्था, क्रीडा मार्गदर्शकांना मानधन, कार्यालय खर्च जिल्हा परिषद दरवर्षी शेष फंड व समाज सहभागातून खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दरवर्षी रुपये ७२ लक्ष एवढा खर्च अपेक्षित आहे. तथापि जिल्हा परिषद शेष फंडातून मंजूर रक्कमेची मर्यादा लक्षात घेता जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या अनुदानाशिवाय लोकसहभाग माध्यमातून निधी जमा करण्याचा मानस आहे. या मुळे जिल्हा परिषद निवासी क्रिडा प्रबोधिनीतील मुलांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देता येतील. निवासी क्रिडा प्रबोधनी मध्ये शिकणारी मुलेही जिल्हा परिषद शाळेतील असुन याच जिल्ह्यातील आहेत. त्यांना आधुनिक व्यायाम शाळा साहित्य आणि उत्तम दर्जाचे सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे अल्पावधीत निवासी क्रिडा प्रबोधनी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धेत तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत व दहा मुलांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. विभागीय स्तर व राज्य स्तरावरील स्पर्धेमध्ये प्रबोधन बहुतेक सर्व मुलांनी सहभाग नोंदवला आहे. यापुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जालना जिल्ह्यात नाव उज्वल होण्यासाठी क्रिडा प्रबोधनी मुळे हे शक्य होणार आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणारे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी एक पत्र काढून १००० रू. मदत वेतनातून देण्याचे जाहीर आव्हान केले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक यांच्या लोकसहभागातुन निधी उपलब्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. या आवाहनास जिल्हा परिषद कर्मचारी व सर्व शिक्षक वेतनातून हजार रुपये देण्यास स्वेच्छेने तयार झाले आहेत. त्यांच्याकडून माहे जानेवारी वेतनातून हजार रुपये कपात करून घेण्यात यावेत व अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नावांच्या यादी व सदर रक्कम गटशिक्षणाधिकारी मार्फत शिक्षण अधिकारी तथा सदस्य सचिव कार्यकारी मंडळ समिती, जिल्हा परिषद निवासी क्रिडा प्रबोधनी यांच्या नावे जमा करावी असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .