pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कॅन्सर व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी शिबीरांचे आयोजन

0 4 1 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

    जालना, दि.4 (जिमाका) :      कॅन्सर व्हॅन जालना जिल्हयामध्ये दि.1 जुलै 2025ते 31 जुलै 2025 पर्यंत  विविध ठिकाणी भेट देऊन कर्करोग निदान, तपासण्यासाठी पाठपुरावा करण्यांत येणार आहे. सदरील मोहिम गाव पातळी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा स्तरापर्यंत राबविण्यांत येणार आहे.

सदरील मोहिमे मध्ये, वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, डेंन्टीस्ट यांच्या मार्फत तपासणी करण्यांत येणार आहे. आरोग्य कर्मचारी व आशा सक्रीय सहभाग घेतील.                                                                                         आवाहन :-जिल्हयातील 30 वर्षावरील पुरुष/स्त्री यांनी तपासणी करुन घ्यावी. यामध्ये मौखिक, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाची तपासणी करण्यात येणार आहे.

सदरील व्हॅन द्वारे कर्करोगाबाबत लवकर निदान होणे, प्रतिबंध करणे, उपचार व जीवनशैलीचा वापर इत्यादी विषयी जनजागृती करणे हे उदिद्ष्ट आहे. जागतिक कर्करोग दिनाचे प्राथमिक उदिद् ष्ट कर्करोगाचे प्रमाण व मृत्यू कमी करणे असुन कर्करोगापासुन बचाव कसा करावा या बाबतची माहिती बाबत जनजागृती करण्याचे उदिद्ष्ट आहे. मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याने या अनुषगांने खालील प्रमाणे गांवनिहाय कॅन्सर तपासणी होणार आहे.

दिनांक                 ठिकाण

1 जुलै 2025       जिल्हा स्त्री रुग्णालय, जालना

2 जुलै 2025         प्रा.आ.केंद्र दुधना काळेगाव

3 जुलै 2025           प्रा.आ.केंद्र मानेगांव

4 जुलै 2025      प्रा.आ.केंद्र पिरपिंपळगांव

7 जुलै 2025           प्रा.आ.केंद्र वाकुळणी

8जुलै 2025            प्रा.आ.केंद्र सोमठाणा

9 जुलै 2025            प्रा.आ.केंद्र केदारखेडा

10 जुलै 2025     प्रा.आ.केंद्र रे. पिंपळगांव

11 जुलै 2025      प्रा.आ.केंद्र धावडा

14 जुलै 2025     प्रा.आ.केंद्र खासगांव

 15 जुलै 2025     प्रा.आ.केंद्र कुंभारझरी

16 जुलै 2025         प्रा.आ.केंद्र डोणगांव

17 जुलै 2025   प्रा.आ.केंद्र शहागड

18 जुलै 2025   प्रा.आ.केंद्र वडीगोद्री

21 जुलै 2025    प्रा.आ.केंद्र सुखापुरी

22 जुलै 202           प्रा.आ.केंद्र राणी उंचेगांव

23 जुलै 2025   प्रा.आ.केंद्र जिरडगांव

24 जुलै 2025   प्रा.आ.केंद्र रांजणी

25 जुलै 2025   प्रा.आ.केंद्र वाटुर

28 जुलै 2025   ग्रा.रु.परतुर

29 जुलै 2025   प्रा.आ.केंद्र श्रीष्टी

30 जुलै2025     प्रा.आ.केंद्र पाटोदा

31 जुलै 2025    प्रा.आ.केंद्र दहीफळ खंदारे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे