
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.15
गावातील सामाजिक राजकीय आणि सगळ्या प्रकारे गावातील समस्या प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रश्न कोणाकडे मांडावे आणि कोण सोडविणार या बाबत टेंभुर्णीकरांच्या बाबतीत संभ्रम आहे.हा संभ्रम दूर होण्यासाठी मानव सेवा मंडळाने पुढाकार घेत गावातातील प्रत्येक गल्लीत लहान भागात जाऊन हृदय संवाद यात्रा घेऊन सर्व सामान्य मध्ये जागरूकता निर्माण करणे लोकांच्या अडचणी पाहणे त्यांच्या मध्ये विश्वास निर्माण करणे सरकारी योजना बद्दल माहिती देणे असे विविध कामे मानव सेवा मंडळा कडून केल्या जात असल्या मुळे सर्व सामान्य जनतेमध्ये यांच्या बद्दल विश्वास निर्माण झाल्याचे दिसत आहे. या वेळी मानव सेवा मंडळाच्या वतीने संजय राऊत यांनी धनगर गल्ली मध्ये जाऊन हृदय संवाद यात्रा मार्फत संवाद केला.या वेळी येथील तरुण उपस्थित होते या मध्ये दत्ता सोनसाळे, पवन पाचे, संतोष पाचे, एकनाथ धारे, सुनील सोनसाळे, सतीश बकाल, लखन धारे, परमेश्वर पाचे,विठ्ठल रांधवन, गजानन सोनसाळे, नारायण सोनसाळे, संतोष सोनसाळे ,सुनील रोडगे, वाल्मीक सोनसाळे यांची सह आदीची उपस्थिती होती.



