प्राथमिक शिक्षक संघाच्या जालना तालुका अध्यक्षपदी प्रमोद पवार तर सचिवपदी सतीश पडघन यांची निवड.

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.12
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जालना तालुका कार्यकारी पुनर्रचना करण्यासाठी सहविचार सभा जालना व बदनापूर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मध्ये आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री बाबासाहेब जुंबड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा पदाधिकारी दिलीप जायभाये, शिवाजी बांदल, उद्धव जायभाये, गणेश पवार, प्रदीप साळोक, अमोल वायाळ, मंता फुके, देविदास निकम, राजू खरात, जयदीप शेळके, बाळासाहेब देशमुख, कारभारी नरवडे, जगन्नाथ शिंदे, प्रकाश यादव, सुधाकर पवार इत्यादी होते. कार्यक्रमास प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष श्री केशवराव जाधव सर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले व सर्व पदाधिकाऱ्यांस पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महिला आघाडीच्या राज्य पदाधिकारी श्रीमती सोहनी मॅडम यांनी देखील सर्वांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष भडांगे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री भास्कर पोहेकर सर यांनी केले.
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी श्रीमती मीरा भंडे, मॅडम जालना तालुका अध्यक्ष पदी श्रीमती शीला नागरे यांची निवड करण्यात आली.आंतर जिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या व जिल्ह्यातील असे एकूण 45 शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री बाबासाहेब जुंबड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संघटनेमध्ये प्रवेश केला.प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदी राजू खरात तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल बोरुडे यांची निवड करण्यात आली.
प्राथमिक शिक्षक संघाच्या जालना तालुका कार्यकारणीची खालील प्रमाणे निवड करण्यात आली.
1.गणेश भुतेकर (तालुका नेते)
1. प्रमोद पवार (अध्यक्ष)
2. सतीश पडघन (सचिव)
3. प्रदीप नागरे (कार्याध्यक्ष)
4. अविनाश उस्तुर्गे (कोषाध्यक्ष)
5. माधव भोसले (कार्यकारी अध्यक्ष)
6. सुधाकर इंगोले (संपर्कप्रमुख)
7. सतीशकुमार बुंधे (उपाध्यक्ष)
8. शिवाजी शिंगणे (उपाध्यक्ष)
9. अशोक चावरे (संघटक)
10) प्रेमनाथ पवार (संघटक)
11) बाबासाहेब गायकवाड (सहसंघटक )
12. सुदर्शन भुतेकर (सह संपर्क प्रमुख)
13) दत्तात्रय कुलकर्णी (चिटणीस)
14) ज्ञानेश्वर बोरूडे(चिटणीस)
15)विनोद गढीकर(प्रसिद्धी प्रमुख)
15)प्रमोद साठेवाड (प्रसिद्धी प्रमुख)
महिला प्रतिनिधी
1)श्रीमती अपर्णा जोशी
2) श्रीमती विद्या पाटील
3)श्रीमती स्नेहलता निर्मल
4)श्रीमती अश्विनी पाटील
5)श्रीमती सिमा बार्हाळीकर तसेच कार्यकारीणी निवडीच्या कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षक संघाचे आप्पासाहेब अवघड, मनोहर साबळे, गणेश वाघ, प्रकाश गिरी, गौतम ढवळे,सुखदेव खरात, मनोज जुंबड, शाम मोगरगे, बाबासाहेब शिंदे, शिवाजी तिडके, कारभारी नरवडे, प्रकाश कासार, पांडुरंग शिंदे, चत्रभूज कव्हळे,राजेश्वर नाईक, प्रकाश यादव, बबन यादव, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.



