pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नाद भयंकर,भोले शंकर ग्रुपची कौतुकास्पद कामगिरी

स्वयंभू महादेव देवस्थान परिसराची पर्यावरण पूरक स्वच्छता मोहीम यशस्वी

0 3 8 6 5 3

अनिल भालेकर/ अंबड,दि. 24

जन्मलो त्या मातीला आपलं काही देणं आहे,हक्क आणि ईमानची मूठभर माती घेणं आहे. या आदर्श विचाराने आपली सामाजिक बांधिलकी जपत अंबर शहरातील “नाद भयंकर, भोले शंकर” ग्रुपची कौतुकास्पद कामगिरी सर्वांच्या अभिनंदन आस पात्र ठरत आहे.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक कसरतीचे महत्त्व ओळखून एकत्र व्यायाम करण्यासाठी एकत्रित आलेल्या या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, राष्ट्रीय पर्यावरण रक्षण बाबत जागृतता दाखवत आदर्श उपक्रमाचे आयोजन वेळोवेळी केले जाते.
अंबड शहरापासून जवळच असणारे नैसर्गिक रम्य वातावरणात वसलेले स्वयंभू महादेव डोंगर देवस्थान येथे संपूर्ण श्रावण महिन्यात अंबड शहर व पंचक्रोशीतील भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या संपूर्ण श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे देखील आयोजित या ठिकाणी होत असते.
नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असून त्यांना राहण्यास योग्य असे हे ठिकाण आहे. पर्यावरणाचे महत्त्व ओळखून वनसंपदेची कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून नाद भयंकर भोले शंकर ग्रुपच्या वतीने दिनांक 24 ऑगस्ट रोजी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा जमा करण्यात आला त्याचबरोबर संपूर्ण मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी डोंगर परिसरामध्ये वृक्षरोपण देखील करण्यात आले.
या स्वच्छता उपक्रमामध्ये राजू पाटील वाघुंडे, नारायण शेळके, संभाजी वराडे, दत्ताशेठ लांडे, विलासशेठ मुंजाळ,महेश लबडे, शिवप्रसाद वाघुंडे, बाळासाहेब खरात, विनोद खरात, संतोष खरात,शैलेश देशमुख, जगदीश कणके, अशोक कणके, धनंजय जोगी, सतीश देशपांडे, विकी शेवाळे यांच्यासह लहान बालके देखील सहभागी झाली होती.
जागृत देवस्थान व नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या स्वयंभू महादेव डोंगर परिसराची अत्यंत योग्य पद्धतीने व परिणामकारक स्वच्छता मोहीम राबवल्याबद्दल ग्रुपच्या सर्व सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे