pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सहनशक्ती च्या अभावामुळे जीवनातील समाधान हरवले – काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी

गेवराई येथे काशी जगद्गुरु यांचा दर्शन सोहळा संपन्न

0 1 7 4 0 8

गेवराई/प्रतिनिधी, दि.6

 

प्रत्येक व्यक्तीने तपश्चर्या केली पाहिजे. तपश्चर्या ही हिमालयात जाऊनच करावी असे नाही तुम्ही तुमच्या घरातही तपश्चर्या करू शकता.तप म्हणजे सहनशक्ती वाढून घेणे. तप केल्याशिवाय मनुष्याला समाधान मिळत नाही.
घरात होणाऱ्या वादा मुळे एका घराचे अनेक घर होतात. त्यामुळे वाद टाळण्यासाठी आपली सहनशक्ती वाढवणे म्हणजे तपश्चर्या. असे आशीर्वचन श्री श्री १००८ काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी गेवराई मधील धर्मसभे मध्ये बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर, मनीकंठ शिवाचार्य महाराज दहिवडकर, शिवलिंग शिवाचार्य महाराज खळेगावकर, आदींची आशीर्वाद पर उपस्थिती होती.

गेवराई शहरातील वीरशैव समाज बांधवांच्या वतीने काशी जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दर्शन सोहळा व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी काशी जगद्गुरुंची सुसज्ज अशा रथामधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी वीरशैव समाजातील महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या तर पुरुषांनी पांढरा पोशाख परिधान केला होता. टाळ मृदंगाच्या व गुरुराज माऊली या गजरात भव्य शोभायात्रा नॅशनल हायवे पासून तर प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महाराज मंगल कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरुंच्या व शिवाचार्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मंत्रोच्चाराने कारण्यात आली. लिंगैक्य प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर गेवराई येथील वीरशैव समाजाच्या वतीने काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा व उपस्थित शिवाचार्यांचा महावस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आपल्या आशीर्वाचनांमध्ये बोलताना काशी जगद्गुरु म्हणाले की, लिंगैक्य प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांनी प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये काशी, उज्जैन, केदारनाथ, बद्रीनाथ, कपिलधार आदी ठिकाणी जाऊन तपो अनुष्ठान केले त्यामुळे त्यांना तपोरत्नही पदवी जगद्गुरुंनी बहाल केली होती.आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याने दररोज प्रत्येकाने लिंग पूजा करावी कपाळावर भस्म लावावा. गुरुचे नामस्मरण करावे. असे आशीर्वाचन यावेळी धर्म सभेत बोलताना काशी जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी यावेळी केले. रामेश्वर येथे भव्य स्वरूपाचे असे भक्त धाम उभारण्याचा मानस यावी जगद्गुरूंनी व्यक्त केला आहे. यामध्ये त्याचा साधारण सर्व समाज बांधवांनी याच्या देणगी स्वरूपात दान करावे असे आवाहन यावेळी जगतगुरुंनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर अधिक मास हा तीन वर्षांमधून एकदा येतो मात्र हा मनुष्यासाठी पुण्य कमावण्याची एक सुवर्णसंधी आहे. या मासामध्ये गुरूला दान करण्यात मध्ये जे पुण्य असते ते पुण्य कशातच नसते. आज काशी जगद्गुरु च्या रूपाने आपल्याला साक्षात काशी विश्वेश्वराचे दर्शन झाले आहे. असे आशीर्वचन यावेळी माजगावकर महाराज यांनी केले.
तर मनीकंठ शिवाचार्य महाराज दहिवडकर यांनी आपल्या आशीर्वाचनांमध्ये सांगितले गेला एक महिना जगद्गुरु च्या सहवासामध्ये आम्ही धर्माचा प्रसार व प्रचार करत आहोत त्यांचा सहवास आम्हाला लाभला हे आमचे भाग्य मोठे आहे. श्री श्री १००८ काशी जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी जो रामेश्वरम मध्ये भक्त निवास बांधण्याचा संकल्प केला आहे त्यासाठी गेवराई शहरातील वीर सेवा समाजांनी मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन यावेळी मनीकंठ शिवाचार्य महाराज दहिवडकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या शेवटी जगद्गुरूंची आरती झाली त्यानंतर सर्व समाजाला महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात वीरशैव समाज च्या महिला व पुरुष व बालगोपाल यांचा सहभाग होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे