शिवसेना शिंदे गटाच्या उरण शहर प्रमुख पदी सुलेमान शेख यांची नियुक्ती
कर्जत येथे शिवसेनेत नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आणि पदनियुक्ती

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.05
शिवसेना उरण तालुकाप्रमुख महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथे पक्षप्रवेश आणि पदनियुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सुलेमान मुस्ताक शेख, दर्शन सुरेश जळगावकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर सुलेमान शेख यांना उरण शहर प्रमुख आणि दर्शन जळगावकर यांना उरण उपशहर प्रमुख या पदांची जबाबदारी देण्यात आली. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते ही पदनियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाला शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , युवा सेना राष्ट्रीय सचिव रुपेश पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुप्रिया साळुंखे मॅडम आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार महेंद्र थोरवे,शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर ,शिवसेना तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत पक्षबांधणीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.
या पदनियुक्तीमुळे उरण परिसरातील शिवसेनेची संघटना अधिक बळकट होण्यास हातभार लागणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
—————————————————————-
सुलेमान शेख यांचा थोडक्यात परिचय
२००० साली राजकारणात सक्रिय सहभाग
शिवसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी सेनेत कार्यरत. उरण शहर विभाग प्रमुख, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध सामाजिक कार्यात सक्रिय
त्यानंतर राजसाहेब ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्या नंतर मनसे मध्ये पक्ष प्रवेश. मनसेचे उरण शहर अध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळली. उरण मध्ये मनसेचा तळागाळात प्रचार व प्रसार करण्यात मोठा वाटा.
कोणताही गाजावाजा न करता गोर गरिबांना नेहमी मदत करतात.