अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या पिक नुकसानाची मिळणार नुकसान भरपाई
जालना/प्रतिनिधी,दि. 7
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मुग व उडिद या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने जिल्हयामधील शेतकऱ्यांनी पिक नुकसानी बाबत एकूण ४८७८३४ पूर्वसूचना विमा कंपनीस प्राप्त झालेले आहे. त्यानुषंगाने युनिव्हर्सल सोंपो जनरल इंन्शुरन्स कंपनीस पिक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करणे बाबत सूचना देण्यात आलेल्या असून त्यानुसार कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी जालना श्री. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
जालना जिल्ह्याचे माहे जून ते सप्टेंबर दरम्यानचे सरासरी पर्जन्यमान ६०३.१ मौगी इतका असून सन २०२४-२५ मध्ये ८१२.४ मीमी इतका पाऊस पडलेला आहे व त्याधी टक्केवारी सरासरीच्या तुलनेत १३४.९% इतकी आहे. जालना जिल्ह्याचे माहे सप्टेंबर चे सरासरी पर्जन्यमान १४१.८ भीभी इतका असून सन २०२४-२५ मध्ये २२१६.९ भीभी इतका पाऊस पडलेला आहे व त्याची टक्केवारी सरासरीच्या तुलनेत १६० १% इतकी आहे. माहे सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडिद, फळपिकांचे असे एकूण २५५५१९.९५ है. क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. त्यानुसार २८२५३८ शेतकऱ्यांना ४१२.३० कोटी रक्कमेची नुकसान अनुदानाबाबतची मागणी शासनास केलेली आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.