जाफराबाद, दि 1
बुलडाणा अर्बन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची टेंभुर्णी कार्यक्षेत्रातील सभासद शेतकर्यांना सोयाबीन विक्रीची सुवर्ण संधी….
बुलडाणा अर्बन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचेवतीने बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना त्यांचे सोयाबीन विक्रीसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ज्या शेतकर्यांना आपले सोयाबीन विक्री करावयाचे असेल त्यानी बुलडाणा अर्बन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे कार्यालय, बुलडाणा अर्बनचे वेअरहाऊस परिसर, टेंभुर्णी गोडाऊन वर येथे आणुन द्यावा. जे शेतकरी सभासद नसतील त्यांना सभासदत्व घ्यावे लागेल, त्यासाठी आपल्या नावाचा 7/12 व सभासद वर्गणी रु. 500/- सोबत आणावे. सोयाबीनधारक शेतकर्यांना त्या दिवशी जो बाजार भाव असेल त्या भावाप्रमाणे रक्कम त्यांचे खात्यात जमा करण्यात येईल व कंपनी ज्या दिवशी सोयाबीन माल विक्री करेल त्या दिवशी जो नफा राहील त्यातुन सोयाबीन विक्रेत्या शेतकर्यांना बोनस देण्यात येईल. वुलडाणा अर्बन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी दिनांक 5 नोव्हेंबर 2025 पासुन खरेदी सुरवात करणार असुन खरेदीची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील तसेच खरेदी सर्व दिवशी सुरु राहील. सोयाबीन विक्री करतांना माॅईश्चरचे प्रमाण 12% पेक्षा जास्त नसावे. डागी व माती असलेले सोयाबीन घेतले जाणार नाही. सोयाबीनमधे माती असल्यास मातीच्या प्रमाणात कट्ट्याची वजन पकडण्यात येईल. शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची हमाली, अडत किंवा बारदानचा खर्च लागणार नाही तरी शेतकरी बांधवांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष श्री. राधेश्याम चांडक, टेंभुर्णी बुलढाणा अर्बन शाखेचे डॉक्टर अविनाश सुरोशे सल्लागार मंडळ, शाखेची व्यवस्थापक व सर्व कर्मचारी यांनी केले आहे



