इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेतील लाभार्थ्यांनी मोबाईल ॲपद्वारे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

जालना/प्रतिनिधी,दि.8
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ सेवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा सेवा निवृत्ती चोजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग सेवा निवृत्ती योजनेतील लाभार्थी यांना आवाहन करण्यात येते की, केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक नवीन सुविधा विकसित केली आहे. बेनिफिशरी सत्यपान ॲप या नावाने एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. या ॲपद्वारे लाभार्थ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन तयार करता येणार आहे. या अॅपचा उपयोग करून, लाभार्थ्यांनी आपली हयात स्वतःच्या मोबाईलवरूनच सिद्ध करता येणार आहे. हे प्रमाणपत्र एनएसएपी पोर्टलवर थेट अपडेट होणार आहे. “यामध्ये आधार प्रमाणीकरणाचा वापर करून प्रक्रिया पार पाडली जाते. ज्यामुळे प्रक्रिया सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक असणार आहे.” प्रक्रिया आधार प्रमाणीकरणावर आधारित, सोप्या, सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने पूर्ण होते.लाभार्थी स्वतः मोबाईलवरून, सहकारी, महा ई-सेवा केंद्र, तलाठी किंवा तहसील कार्यालयाच्या मदतीने ही प्रक्रिया करू शकतात.
यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून खालील दोन अॅप डाऊनलोड करावे. आधार फेस आरडी ॲप (AadhaarFaceRd App) बेनिफिशरी सत्यपान ॲप (Beneficiary Satyapan App) बेनिफिशरी सत्यपान ॲप (Beneficiary Satyapan App) ओपन करा, भाषा निवडा. डिव्हाईस रजिस्ट्रेशन (Device Registration) करावे. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल (ऐच्छिक) टाकाणे. तसेच OTP टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा. फेस ऑथेंटीकेशन (Face Authentication) करावे. मोबाईलचा कॅमेरा वापरून डोळ्यांची हालचाल करून सेल्फी घ्यावी. त्यानंतर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट (Beneficiary Verification Certificate) मिळेल. सर्व लाभार्थ्यांनी आपल्या हयातीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर बेनिफिशरी सत्यपान ॲप (‘Beneficiary Satyapan App)’ द्वारे ऑनलाईन तयार करून, शासनाच्या योजनांचा लाभ सुरू ठेवावा”. असे तहसिलदार जाफ्राबाद व तहसिलदार जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

