pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरात अखंड शिवनाम सप्ताहास प्रारंभ

0 1 7 4 0 8
जालना/प्रतिनिधी, दि.14
जालना : येथील अंबड रोडवरील उड्डाणपुलानजीक असलेल्या श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरात कै. दिलीपअप्पा खाकरे यांच्या प्रेरणेने पार पडत असलेल्या अखंड शिवनाम सप्ताहास आजपासून प्रारंभ झाला आहे. सप्ताहाचे हे रौप्य महोत्सवी म्हणजेच 28 वे वर्ष असून श्री ग्रंथराज परमरहस्य पारायण व शिवकीर्तन सोहळा यानिमित्ताने आयोजित करण्यात आला असून पुजाविधी कार्यक्रम शिवकुमार संभाप्पा स्वामी मठपती (कौठा) ता. कंधार, शरणय्या स्वामी गुरुजी, गणेश स्वामी जालना, प्रकाश मठपती स्वामी जालना, अमोल स्वामी जालना यांच्या हस्ते पार पडला आहे. तर परमरहस्य पारायण व्यासपीठाचे प्रमुख शिभप रमेश महाराज लोणगावकर (राजूर) हे करत आहेत. यानिमित्त दररोज सकाळी 5 ते 6 यावेळेत काकडा, 6 ते 7 शिवपाठ, 7 ते 8 दरम्यान रुद्राभिषेक, 9 ते 11 या वेळेत ग्रंथराज परमरहस्य पारायण आणि 11.30 ते 1. 30 यावेळेत ॐ नम: शिवाय जप त्यानंतर आरती तर सायंकाळी 4 ते 5 यावेळेत परमरहस्यावरील प्रवचन आणि 5 ते 7 शिवपाठ तर रात्री 8.30 ते 10.30 या दरम्यान शिवकीर्तन होणार आहे.
गुरुवार दि. 15 रोजी शिभप डॉ. साध्वी धर्मसिंहणी गायत्री दीदी, शुक्रवार दि. 16 रोजी शिभप कु.साक्षीताई मुळे, शनिवार दि.17 रोजी शिभप श्री. ओंकार स्वामी, रविवार दि. 18 शिभप श्री. पद्मनीताई खराडे, सोमवार दि. 19 रोजी ष.ब्र.108 शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, मंगळवार दि. 20 फेब्रुवारी रोजी ष. ब्र. 108 विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे किर्तन होणार आहे. तर दि. 21 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत प्रसादाचे किर्तन ष.ब्र.108, सिध्दचैतन्य शिवाचार्य महराज साखरखेर्डा यांचे किर्तन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा पंचक्रोशितील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
कै. दिलीपअप्पा खाकरे यांच्या प्रेरणेने पार पडत असलेल्या या सप्ताहासाठी मनोहरअप्पा खाकरे, समितीचे अध्यक्ष बंडूअप्पा परदेशी, गणेशअप्पा एलगुंदे, बबनअप्पा लामधाडे, लाटकर साहेब, मारोती नळे, कल्याणअप्पा चामनूर, मनोहर परदेशी, शिवलिंग तळणकर, राजूअप्पा दसमले हे हा सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे