शेलूद येथील नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रात कार्यक्रम

भोकरदन/ संजीव पाटील,दि.21
भोकरदन तालुक्यातील शेलुद येथे १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता व्यसनाधीनता हा मनुष्यातला एक मोठा लागलेला कलंक तर आहेच ? परंतु त्याहीपेक्षा तो सर्वसाधारण गोरगरीबांना लागलेला खूप मोठा श्याप असून, आपण व्यसनापासून अलिप्त राहिले पाहिजे, असे मत पारध पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांनी शेलूद येथील नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रात भेट देऊन उपचार घेत असलेल्या बांधवांना मार्गदर्शन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील हभप ज्ञानेश्वर महाराज शेलूदकर संचलित नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी आलेल्या बांधवांसाठी बुधवारी संतोष माने यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की, व्यसनामुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आणि आर्थिक हानी होते.७० ते ८० टक्के गुन्हे हे केवळ व्यसनाधीनतेमुळे होत असल्याचा. आमचा आजवरचा अनुभव आहे.व्यसनाच्या आहरी गेल्यामुळे सुखी संसारावर याचा परिणाम होतो.यामुळे मुलाबाळासह आई-वडील, पत्नी यांच्यावर उपासमारीची वेळ येते.त्यासाठी आपण व्यसनापासून अलिप्त राहून समाजात ताठ मानेने जगायला पाहिजे.मणावर ताबा ठेवल्यास तुम्ही नक्कीच व्यसनमुक्त व्हाल याला फक्त मनाचा निश्चय पाहिजे निश्चय असला तरच आपण व्यसनमुक्त जिवन जगू शकतो असा विश्वास माने यांनी व्यक्त केला आहे.या वेळी रवींद्र लोखंडे, सुभाष सोनुने, गणेश बारोटे, अरुण खडके, सारंगधर खडके यांच्यासह व्यसनमुक्ती केंद्रातील बांधवांसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.