pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

चालक वाहकाच्या मनमानीला कंटाळून बरडशेवाळा येथील विद्यार्थ्यासह पालकाने अखेर गाठले पोलीस ठाणे

0 1 7 4 1 4

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.31

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बरडशेवाळा येथे विविध कार्यालये असून कामासह येजा करण्यासाठी कवाना चेंडकापुर सह परिसरातील अनेक गावे आहेत. याठिकाणी बायपास मुळे व जुन्याच रस्त्यावर खड्डे असल्याने शालेय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासह प्रवास्यांना नाहक त्रास होत असल्याने गावक-यांनी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे आपल्या अडचणीचा पाडा वाचला होता. काम करणाऱ्या कंपनीलाच वाईट दिवस आले असल्याने आमदार जवळगावकर यांनी जायमोक्यावर जाऊन स्वखर्चातुन खड्डे बुजवुन देत विभागीय नियंत्रक आगार प्रमुखाला आवश्यक सुचना केली असल्याने ब-यापैकी बसेस सह खाजगी वाहतुक गावातुन ये जा करत आहेत. काही मुजोर चालक वाहक मनमानी करत बायपासनेच जात असल्याने वेळेनुसार शुक्रवार 29 डिसेबंर रोजी सकाळी दहा च्या दरम्यान गावातील विस हुन अधिक शालेय मुली बायपास थांबल्या होत्या. त्यावेळी नांदेड वरुन माहुर कडे जात असलेली माहुर आगाराची एम.एच.14 बि.टी. 1569 एसटी बसने त्याठिकाणी थांबून काही प्रवास्यांसह विद्यार्थ्यांना आत घेताना वाद घालत दरवाजा बंद करण्यासाठी मुलीना ढकलुन दिल्याने पळसा येथील चक्रवर्ती अशोक विद्यालयात दहावी मध्ये शिक्षण घेत असलेली राखी संतोष मस्के खाली पडुन जखमी झाल्याची घटना घडली. अश्या अवस्थेत चालक वाहकाने मदत करणे अपेक्षित असताना मुली खाली उतरुन आपली बस पुढील प्रवासासाठी गेली असल्याची उपस्थित शालेय विद्यार्थ्यानी सांगीतले . घटनेची माहीती मिळताच पांलकानी सततच्या मनमानीसह घडलेल्या घटनेवरून आपल्या मुलीसह मनाठा पोलीस स्टेशन गाठून संबंधित वाहन चालकावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. सहा महिन्यांपुर्वीच येथीलच पत्रकाराचा माहुर आगारातील चालकाने बायपासनेच जात असल्याचा फोटो काढल्याचा राग धरुन मोबाईल पाण्यात फेकुन दिल्याची घटना घडली होती. माहुर आगारातील चालक वाहकाच्या मनमानीला शालेय विद्यार्थ्यासह पालक कंटाळले असून वरिष्ठ विभागाने दखल घ्यावीत अन्यथा वेगळा पर्याय निवडावा लागेल अशी मागणी व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे