ताणतणाव न घेता विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे. यश निश्चित मिळते.
श्री सरस्वती भुवन प्रशालेच्या १० वी,१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला सामोरे जाताना कार्यशाळा

विरेगाव / गणेश शिंदे, दि.6
घनसावंगी तालुक्यातील रांजनी येथील श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ताणतणावाचे व्यवस्थापन याविषयीची कार्यशाळा मंगळवारी घेण्यात आली
प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रमोद कुमावत म्हणाले विद्यार्थ्यांनी परिक्षेविषयी भिती कमी करावी.विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून बोलते केले. विद्यार्थ्यांनी आवड,क्षमता,संधी ओळखून क्षेत्र निवडावे,पाठांतर न करता समजून घ्यावे. संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. आणि तुमचा संघर्ष अभ्यास करणे हा आहे.
ज्ञान मिळवा ज्ञान ही अशी बाब आहे,ती कोणीच हिरावून घेऊ शकत नाही,त्याचा भार डोक्यावर कधीही नसतो. ताणतणाव न घेता विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे. यश निश्चित मिळते. अपयशाने खचून न जाता स्वतःमध्ये निगेटिव्ह वृत्ती निर्माण करू नका, नेहमी पॉझिटिव्ह राहा.असे प्रतिपादन श्री सरस्वती भुवन प्रशालेच्या १० वी,१२ वीच्या विद्यार्थी कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत यांनी व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष गौतम देशमुख, मुख्याध्यापक तथा प्राचार्य मधुकर बिरहारे
ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत, अधिव्याख्याता योगेश्वर जाधव उपस्थिती होती.
अतुल हेलसकर यांनी प्रशालेतील शैक्षणिक,भौतिक बाबी व विविध उपक्रमांची माहिती दिली. योगेश्वर जाधव यांनी विद्यार्थ्यांना आपल्याला स्वतः आवडलेले क्षेत्र निवडा’ आपले करिअर घडवताना ताणतणाव न घेता आपल्या क्षमता ओळखा.असे मत व्यक्त केले.
गौतम देशमुख म्हणाले विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे द्यावीत, परीक्षेत जाताना ताणतणाव घरी सोडून आनंदाने पेपर लिहा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
सूत्रसंचालन सहशिक्षक श्री विष्णू पाटील यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर वनगुजरे यांनी मानले