pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दोन सख्या चुलत भावाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू . लहान भावाला वाचविताना दुसऱ्या भाऊ ही बुडाला.

0 3 8 3 5 2

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.17

सकाळी शाळेत गेले आणि दुपारी बारा वाजता घरी आले.घरी दप्तर ठेवून गाव जवळील तळ्यात जाण्याचा मोह आवरला नाही आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने या तळ्यात बुडून या दोन्ही सख्या चुलत भावाचा करून अंत झाला.
देऊळगावराजा येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल मधून घरी आल्यावर पोहण्याचा आनंद घेताना लहान विद्यार्थी कुणाल कृष्णा आढे वय 13 वर्ष आणि ओम गणेश आढे वय 11 वर्ष या दोन विद्यार्थी यांचे दुःखद निधन झाले असून या घटने मुळे गावात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ही घटना टेंभुर्णी जवळील वाडोना तांडा येथील आहे.
लहान भाऊ पाण्यात बुडत आहे हे पाहून मोठ्या भावाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्याला वाचवू शकला नाही आणि आपला ही जीव गमावून बसला. यातील कृष्णा हा घरातील एकमेव मुलगा असून त्याला दोन बहिणी असून आई वडील आणि आजी आजोबा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दुसरा भाऊ ओम याला एक भाऊ आणि एक बहीण असून आई वडील काका असा परिवार आहे. झालेल्या या दुःखद घटने बाबत येथील ग्रामीण रुग्णालयात लोकांनी त्यांना पाहण्यासाठी धावपळ करत येथे आलेल्या त्यांना परिवार जणांची सांत्वना केली. या दोघा विद्यार्थी यांच्या वर दुपारी पांच वाजे च्या जवळपास मोठ्या दुःखाच्या वातावरण नगर अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी मोठा जनसमुदाय नातेवाईक उपस्थिती होते.या वेळी ज्या शाळेत ही विद्यार्थी शिकत होते त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांचे शिक्षक ही आले होते त्यांचे ही डोळे या वेळी अश्रुंनी भरून गेले होते चांगले विद्यार्थी गेल्याचे दुःख त्यांचा चेहऱ्यावर दिसत होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे