प्रा.सुभाष जिगे यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार…

जालना/प्रतिनिधी,दि.3
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन व भूगोल विषयाची रुची निर्माण करण्यासाठी केलेले मार्गदर्शन तसेच विद्यार्थी हित लक्षात घेऊन भूगोल प्रज्ञाशोध केंद्रामार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेसाठी सक्रीय सहकार्य केल्याबद्दल अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील रहिवासी तथा कर्जत येथील राजुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा.सुभाष विठ्ठलराव जिगे यांना नुकताच ‘उपक्रमशील भूगोल शिक्षक पुरस्कार २०२४ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.मानचिन्ह , प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्काराबद्दल प्रा.जिगे यांचे शेतीनिष्ठ शेतकरी पांडुरंग तात्या डोंगरे, सचिव डॉ.राहुल पाटील डोंगरे, शिक्षणाधिकारी मंगलताई धुपे, डायटचे प्राचार्य डॉ राजेंद्र कांबळे, गटशिक्षणाधिकारी गोविंद चव्हाण, प्रा .बटुळे, प्राचार्य विलास टकले, प्रा.ओमप्रकाश घुगे,प्रा.भरत शेरे, अंकुश वीर, धनाजी जाधव, सचिन टेकाळे , सुनिल चव्हाण , सुंदर बुनगे, वैभव मुळी, ज्ञानेश्वर पैठणे , अभिजीत उंडे , शिक्षकेत्तर कर्मचारी भिकन कोकणी, अशोक उगले, विलास घुले, वाल्मीक सपकाळ , विष्णू घुगे व गावकरी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
प्रा.सुभाष जिगे यांच्या पुरस्काराबद्दल कर्जत येथील राजुरेश्वर विद्यालयात सत्कार करतांना सचिव डॉ राहुल पाटील, प्राचार्य विलास टकले, सरपंच संजय काळुंके, उपसरपंच आण्णासाहेब डोंगरे, श्रीहरी डोंगरे, तलाठी सूलाने, विजय डोंगरे, ज्ञानेश्वर डोंगरे, प्रा.सानप, गवळी, नसीर शेख, ब्रम्हदेव मुंढे आदी…