वीर वाजेकर महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
दिनांक ८ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका तसेच महिला सेवकांचा सन्मान चिन्ह देवून महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गजानन चव्हाण,उपप्राचार्य यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उद्देश नेमका काय आहे, याविषयी मते नोंदविली. १९७५ साली Towards Equality चा उल्लेखही त्यांनी केला. राजकीय,आर्थिक तसेच सामाजिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.लिंगभाव,लिंगभेद ही विषमता कमी करता यायला हवी.२०२५ च्या महिला दिनाचे घोषवाक्य ‘समान-संधी,समान-न्याय’ उपलब्ध करून देणे हे आहे.भावनाताई घाणेकर यांनी आपल्या मनोगतातून स्त्रियांचे राजकारणातील स्थान अल्प असण्याचे प्रमुख कारण म्हणजे स्त्रियांच्या जीवनात ‘संघर्ष’ अटळ असल्याचे नमूद केले.सर्वच स्तरावर महिलांना संघर्ष करावा लागतो आहे.स्त्रीने कसे अदबीने वागले पाहिजे हे आपल्या संस्कृतीने तिला लहानपनापासूनच अशी शिकवण दिली आहे.पुरुष आणि स्त्री दोघेही कमावते असले तरी घरातील सर्व कामे आजही एकटया स्त्रीला करावी लागतात,अपवाद असतीलही परंतु ही कामाची विभागणी केवळ पुरुषी मानसिकतेतन आली आहे,याचाही उल्लेख त्यांनी केला.स्त्री -भृह्नणहत्येमुळे आज आपल्या देशात मुलींची संख्या कमी झाली आहे.महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.शिक्षण,आरोग्य तसेच समाजातील मोकळीक महिलांना मिळायला हवी.अन्यायाविरुद्ध स्त्रीने बंड करायला हवेत.जोपर्यंत स्त्रीचा आत्मसन्मान या समाजात जपला जाणार नाही तोपर्यंत स्त्री-परुष समानता येणार नाही असेही त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
डॉ.आमोद ठक्कर,प्रभारी प्राचार्य यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महिला सक्षमीकरण,समानता,कामाच्या ठिकाणी आठ तास नोकरी याची मागणी प्रथम महिलांनी केली.जगातल्या अनिष्ट प्रथा विरुद्ध पहिले बंड महिलांनी केले आहे.१८२० साली त्यांच्या हक्कासाठी महिलांनी उठाव केल्याची नोंद सापडते.धर्माच्या नावाखाली आजही महिलांचे शोषण होतांना दिसते आहे.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपन्न झाला तरी आजही महिलांना वंचित ठेवले जाते.पुरुषसत्ताक वर्गाचे राजकारण महिलांचे बळी घेतांना दिसते आहे.जोपर्यंत सर्व क्षेत्रात महिला आघाडी मिळवणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्त्री स्वतंत्र झाली असे म्हणता येणार नाही असे मत व्यक्त केले.प्रा.राम गोसावी यांनी आभार मानले,डॉ.रत्नमाला जावळे, प्रा.सुप्रिया नवले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.प्रा.योगेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी महविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.