pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सतीश घाटगे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश :जायकवाडीत आले मराठवाड्याच्या हक्काचे पाणी

गावागावात शेतकऱ्यांचा जल्लोष : देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

0 1 7 4 0 8
अंबड/प्रतिनिधी, दि.25

तहानलेल्या मराठवाड्याला  उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधित अधिकाऱ्यांना शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण समूहातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जायकवाडीत शनिवारी सकाळी पाणी दाखल झाले. पाणी दाखल झाल्यानंतर अंबड – घनसावंगी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. पाणी सोडल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व न्यायालयीन लढ्याबद्दल सतीश घाटगे यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले. शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून फटाके फोडत पाणी सोडल्याचा जल्लोष साजरा केला.

मराठवाड्याचे पाणी अडविण्यासाठी  पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी दाखल केलेल्या याचीकेविरोधात समृद्धी साखर कारखान्यामार्फत सतीश घाटगे यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेला यश आले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेऊन सरकारला जायकवाडीत पाणी सोडण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार  सतीश  घाटगे यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना देण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २१ नोव्हेंबर रोजी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सतीश घाटगे यांच्या विनंतीची तातडीने दखल घेऊन  मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नाशिकच्या दारणा  धरण समूहातून  जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचे आदेश शुक्रवारी दिले. त्याची तातडीने अंमलबजावणी झाली असून शनिवारी सकाळी जायकवाडी धरणात पाणी दाखल झाले. जायकवाडीत पाणी येताच घनसावंगी – अंबड तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, बाणेगाव, तीर्थपुरी, साष्ट पिंपळगाव , भार्डी सह अनेक गावात शेतकऱ्यांनी  एकमेकांना पेढे भरवून  फटाके फोडत पाणी सोडल्याचा जल्लोष साजरा. शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांचे आभार मानले. तसेच अंबड येथील सतीश घाटगे यांच्या जनसेवा कार्यालयासमोर भाजप पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्त्यांनीही फटाके फोडून आनंदोत्सव साजरा  केला. यावेळी भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रमेश तारगे,युवा नेते  पंकज रक्ताटे, उपसरपंच ईश्वर धाईत, भरत तनपुरे, भाजपा दलित आघाडीचे विलास जाधव,  भास्कर साळवे, कैलास आढे, दत्ता निकम, पुंजाराम भडांगे  यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

——————

मराठवाड्याच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात मिळायला पाहिजे होते. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे हे पाणी अडविण्यात आले होते. या विरोधात समृद्धी कारखान्यामार्फत मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात त्यावर सुनावणी झाली. शेवटी मराठवाड्यातील जनतेचा विजय झाला. न्यायालयाने सरकारला उच्च न्यायालायच्या आदेशाची अंमलबजवणी करण्यास परवानगी दिली. त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार जायकवाडीत पाणी दाखल झाले. या निर्णयाबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.
-सतीश घाटगे, चेअरमन समृद्धी साखर कारखाना

———————
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे