जिल्ह्यात नवीन 49 मतदान केंद्राचा समावेश – उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल
जालना/प्रतिनिधी,दि.19
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हात दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविणे सुरू आहे. या कार्यक्रमा अंतर्गतच जिल्हात नव्याने 49 मतदान केंद्र वाढले असून आता जिल्हात एकुण 1 हजार 699 मतदान केंद्र झाले असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पूर्व पुनरिक्षण उपक्रमातर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे हे नमूद केले होते. त्यानुसार मतदान केंद्राच्या नावात बदल करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करणे, ज्या मतदान केंद्राच्या ठिकाणी 1500 पेक्षा जास्त मतदार आहेत अशा मतदान केंद्राचे विभाजन करुन नवीन मतदान केंद्र तयार करणेबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले होते.
जिल्हातील परतुर, घनसावंगी, जालना, बदनापूर व भोकरदन या पाचही विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून मतदान केंद्राच्या नावात बदल करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करणे, ज्या मतदान केंद्राच्या ठिकाणी 1500 पेक्षा जास्त मतदार आहेतव ज्या ठिकाणी मतदारास मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त किलोमीटरअंतर पार करावे लागत असेल अशा मतदान केंद्राचे विभाजन करुन नवीन मतदान केंद्र तयार करणे याबाबत प्रस्ताव मागवण्यात आले होते.
सदरील प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबई यांना व नंतर तेथून हे प्रस्ताव भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे मंजुरीसाठी पाठवले जातात. भारत निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्यानंतरच विधानसभा निहाय मतदान केंद्र वाढविणे, मतदान केंद्राच्या नावात बदल करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल केले जातात. यासंबंधी दि. 18 आक्टोबर 2023 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबई यांच्या कडून मतदान केंद्राच्या नावात बदल करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करणे,नवीन मतदान केंद्रांना मंजुरी याबाबत आदेश प्राप्त झाले. यानुसार जिल्हात नवीन 49 मतदान केंद्र, 47मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल, 34 मतदान केंद्राच्या नावात बदल झाले आहेत.
विधानसभा मतदारसंघाचे नाव | पूर्वीच्या मतदान केंद्रांची संख्या | मतदान केंद्राच्या नावात बदल झालेले मतदान केंद्रांची संख्या | मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल झालेले मतदान केंद्रांची संख्या | नवीन ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची संख्या | नव्याने मंजूर झालेल्या मतदान केंद्रांची संख्या | ||
1500 पेक्षा जास्त मतदारामुळे वाढलेल्या मतदान केंद्रांची संख्या | 2 किमी किंवा त्या पेक्षा जास्त अंतरामुळे वाढलेल्या मतदान केंद्रांची संख्या | एकूण | |||||
परतुर | 325 | 06 | 02 | 02 | 20 | 22 | 347 |
घनसावंगी | 340 | 14 | 03 | 01 | 11 | 12 | 352 |
जालना | 310 | 05 | 37 | 05 | 02 | 07 | 317 |
बदनापूर | 351 | 04 | 00 | 00 | 04 | 04 | 355 |
भोकरदन | 324 | 05 | 05 | 00 | 04 | 04 | 328 |
एकूण | 1650 | 34 | 47 | 08 | 41 | 49 | 1699 |