सावरमाळ गावाच्या गावकऱ्यांनी दिला आमरण उपोषनाचा इशारा!

नांदेड/प्रतिनिधी, दि.15
मौजे सावरमाळ येथे रब्बी हंगाम 2022 नुकसानीचे पंचनामे नेमलेले कर्मचारी तुकाराम भिमराव श्रीराम यांनी हेतू परस्पर वास्तविक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपासून व लाभापासून वंचित ठेवलेला आहे त्याकरिता नांदेड जिल्हा कार्यालय येथे निवेदन देऊन सुद्धा व परत देगलूर येथे उपविभागीय कार्यालय देगलूर तेथे निवेदन देऊन मुखेड येथे तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन एक महिन्याचा कालावधी होऊन गेलेला असून आज पर्यंत कुठल्याच चौकशीची नोंद घेतलेली नाही तरी सावरमाळ गावातील शेतकरी यांना कुठल्याच प्रकार प्रशासन चौकशीची बाब घेत नसल्याने शेतकरी संतापून गेलेले आहेत व ज्यांच्या शेतात ऍक्च्युली प्रमाणे रब्बी व कर्डी काहीजणांच्या शेतात असून देखील श्रीरामे साहेब यांनी त्याची चौकशी न करता एका बंद खोलीमध्ये बसून जवळच्या व्यक्तींचे नावे समावेश केलेले आहेत समाविष्ट केलेल्या लोकांपासून आम्हाला त्यांना शेतकऱ्यांना ज्या लाभ भेटलेला आहे त्या शेतकऱ्यांची चौकशी व कुठलाच अहवाल आम्ही त्या प्रकारे मांडलेला नाही तरी मेहरबान प्रशासन साहेबांनी तात्काळ चौकशी करावी अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही प्रशासनाला कित्येक वेळेस आम्ही सांगून तरीसुद्धा प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही तरी तातडीने लक्ष द्यावं व योग्यरीत्या कारवाई करावी आम्ही सर्व शेतकरी खूप कंटाळलेले असून आम्हाला अमर उपोषणाशिवाय पर्याय नाही असं सांगून सुद्धा प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही तरी प्रशासन अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की लवकरात लवकर या चौकशीकडे लक्ष द्यावं नाहीतर आम्ही सर्व शेतकरी सावरमाळ वाशी यांनी ठामपणे निर्णय घेतलेला आहे तिथे एक वेळेस साहेब फेरफार नक्कल साठी तलाठी अधिकारी गोरगरीब जनतेकडून पैशाचे आमिष मागत आहे व वडीला पार्जत जमीन वारसांच्या नावावर करण्यासाठी व मुलांच्या व कुटुंबांच्या नातेवाईकांच्या नावावर करण्यासाठी हजारो रुपयांची लूट करत आहे प्रशासनाला एवढेच विनंती आहे की अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची पगार देत आहेत का शेतकऱ्या लुटण्याची पगार देत आहेत एवढेच सांगू इच्छितो आम्ही शेतकरी. लवकरात लवकर चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अन्यथा अमर उपोषण करण्यात येईल हा इशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला