ट्रॅफिक संदर्भात बैठकीचे आयोजन.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)उरण तालुका व शहर च्या दणक्याने उरण मधील प्रशासकीय यंत्रणा जागे झाले असून उरणच्या ट्रॅफिक समस्येवर जे एन पी टी चे अधिकारी, पीडब्ल्यूडी चे अधिकारी व पोलीस खात्याच्या वाहतूक शाखेचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वाची मीटिंगचे आयोजन उरण मध्ये करण्यात आले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उरण तालुक्यातील व शहरांतील सर्व आजी माजी पुरुष पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक हे नेहमी उरण शहरातील व ग्रामीण भागातील विविध समस्यावर नेहमी आवाज उठवित असतात.ट्रॅफिक समस्याने सर्वांना हैराण केले असून उरण तालुक्यातील व शहरातील ट्राफिक समस्येवर जिल्हाप्रमुख तथा माजि आमदार मनोहरशेठ भोईर यांनी विविध ट्राफिक विभागांना पत्रव्यवहार करून उरण तालुक्यातील ट्रॅफिक समस्यावर मार्ग काढण्यासाठी मीटिंगची मागणी केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन जेएनपीटी चे अधिकारी, पीडब्ल्यूडी चे अधिकारी, उरण पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखा अधिकारी, न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखा अधिकारी व गव्हाण पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखा अधिकारी यांनी मिटिंगची तयारी दर्शविली आहे.मंगळवार दिनांक २२ जुलै २०२५ रोजी जेएनपीटी ऑफिसर क्लब, टाऊनशिप येथे संध्याकाळी ४ वाजता मीटिंग चे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण तालुक्यातील व शहरांतील सर्व आजी माजी पुरुष पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संतोष ठाकूर तालुकाप्रमुख उरण यांनी केले आहे.
