कोतवाल भरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू जालना शहरातील 16 परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.5
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता जालना शहरातील एकुण 16 परीक्षा केंद्रावर शनिवार दि. 6 जुलै 2024 रोजी दुपारी 3.30 ते 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करण्यात आले आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी जारी केले आहेत.
जालना शहरातील सेंट मेरी हायस्कूल (जुनी इमारत), सेंट मेरी हायस्कूल (नवीन इमारत), मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय उड्डाणपुलाजवळ, स्वामी विवेकांनद हायस्कुल, मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय नागेवाडी, मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे तंत्रनिकेतन महाविद्यालय नागेवाडी, श्री. वर्धमान एम.एस. जैन (मराठी माध्यम) शाळा गणेशनगर, ऋषी विद्यालय खरपुडी, आर.जी. बगाडिया काला, एस. बी. लखोटिया कॉमर्स, बेंजोजी सायन्सेस (जे.ई.एस.कॉलेज), जिल्हा परिषद मुलींची शाळा, राष्ट्रीय हिंदी विद्यालय, राष्ट्रीय हिंदी विद्यालय, शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय, उर्दू हायस्कुल आणि कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, वर्धमान एम.एस. जैन (इंग्रजी माध्यम) विद्यालय आणि सी.टी.एम.के. गुजराती माध्यमिक विद्यालय मुथा बिल्डींग, जालना या एकुण 15 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. आदेश दि. 6 जुलै 2024 रोजी दुपारी 1 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.