pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पंकज शांतीलाल बीमरोट या मुलाबद्दल माहिती असल्यास पोलिस विभागाशी संपर्क साधावा

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि.7

औरंगाबाद जिल्ह्यातील नागोण्याची वाडी  तालुक्यातील कौचलवाडी येथील पंकज शांतीलाल बीमरोट वय 22 वर्षे याने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी येथील कु.योगिता चैनसिंग घुसिंगे वय 17 वर्षे या मुलीस कशाचे तरी अमीष दाखवून अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवून नेले आहे. मुलाचा रंग गोरा असून उंची पाच फुट 2 इंच आहे. त्याला मराठी, हिंदी भाषा अवगत आहे. केस काळे असून समोरील दोन दात पडलेले आहेत. तरी याबाबत काही माहिती असल्यास सुजान नागरिकांनी माहिती देण्यासाठी मो.8459610483 आणि 02482220650 यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक, पोलिस ठाणे, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2