pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ॐ साई सार्वजनिक पद‌यात्रा मंडळ कोप्रोली आयोजित श्री साई चरित्र पारायण व श्री सत्य नारायणाची महापूजा उत्साहात संपन्न.

0 1 7 4 7 6

उरण/ विठ्ठल ममताबादे,दि.10

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली यांच्या सौजन्याने गुडीपाडव्याच्या शुभमूहूर्तावर सोमवार दि ८/४/२०२४ व मंगळवार दि ९/४/२०२४ रोजी श्री साई चरित्र पारायण व सत्य नारायणाची महापूजा तसेच साई भंडाराचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही दिवस श्री साई बाबांची काकड आरती, बाबांचे मंगलस्नान, साई चरित्र वाचन, मध्यान्ह आरती, हरिपाठ,धूप आरती,दर्शन सोहळा, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दोन्ही दिवसाचे सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ, साईसेवक ग्रामस्थ मंडळ कोप्रोली, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली , सर्व महिला बचत गट,माउली हरिपाठ मंडळ,बापूजी देव, अर्णवी आर्ट आदी विविध सामाजिक संस्था संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात भाविक भक्तांनी, ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात सहभाग दर्शविला.अशाप्रकारे ॐ साई सार्वजनिक पद‌यात्रा मंडळ कोप्रोली आयोजित श्री साई चरित्र पारायण व श्री सत्य नारायणाची महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रम मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे