pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळातर्फे आयोजित गरबेला अलोट गर्दी.

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22

हिंदू धर्मातील पवित्र सणापैकी नवरात्र हा एक महत्वाचा सण आहे. भारतासह देश विदेशात हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.हिंदू धर्माचा, हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा, देवदेवतांची पूजा सर्वत्र व्हावी. हिंदुत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा व नागरिक कलाकारांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने शिवसेनेचे द्रोणागिरी शाखेचे शाखा प्रमुख जगजीवन भोईर यांनी २०२१ साली द्रोणागिरी नोड मध्ये जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळची स्थापना केली. दरवर्षी या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम राबविले जातात. नवरात्रोत्सवाचे मंडळाचे हे ३ रे वर्ष आहे. देवकृपा सर्कल मॅजेस्टीक व्हीलाच्या समोर, द्रोणागिरी नोड, उरण येथे शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा प्रणित जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळातर्फे देवीची सुंदर अशी मूर्ती बसविण्यात आली आहे.देवीचे दर्शन घेण्यासाठी तसेच रात्री भरणाऱ्या गरब्यासाठी न भूतो न भविष्यती अशी अलोट गर्दी गरब्यासाठी होत असते.१५ ऑक्टोबर २०२३ रोजी घटस्थापना झाली. त्यानंतर भजन, रास गरबा, संगीत खुर्ची,कायदेविषयक सल्ला, आरोग्य शिबीर, कवी संमेलन, स्त्री शक्ती महाआरती, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रास गरबा स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सोमवारी २३ ॲाक्टोबर २०२३ रोजी आई इन्फ्राच्या वतीने सिनेअभिनेत्री किशोरी अंबिये रास दांडिया कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे.एकंदरीत सर्व कार्यक्रमांना जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा प्रणित जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष करण पाटील, उपाध्यक्ष रूपेश पाटील, सहखजिनदार स्वप्नील साळुंके,सहखजिनदार धनंजय शिंदे, सचिव सोमनाथ भोईर, सदस्य अंकुश चव्हाण, सदस्य कुणाल घरत,शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट ) चे द्रोणागिरी शाखेचे शहर प्रमुख जगजीवन भोईर, शहर संपर्क प्रमुख कल्पेश पाटील, शहर संघटक – किसन म्हात्रे, व्यापारी असोशिएशन अध्यक्ष रविंद्र पा‌टील, उपशहर प्रमुख प्रतिक पाटील, संघटक करण पाटील तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य विशेष मेहनत घेत आहेत. माजी आमदार तथा शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनीही या मंडळाला भेटू देउन, देवीचे दर्शन घेतले व जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. या मंडळातर्फे आयोजित गरब्याला मोठ्या प्रमाणात रसिक प्रेषक नागरिक येत असल्याने जागा सुध्दा अपूरी पडत आहे. उरणमधील सर्वात एक नंबरचे गरबा हे द्रोणागिरी नोड मध्ये खेळले जात असल्याने द्रोणागिरी नोड मधील गरब्याला आता विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे