pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली उरण, माणगावच्या कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश!

0 3 8 3 5 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15

“कॉंग्रेस हा विचारधारा असणारा पक्ष आहे. सर्वधर्म समभाव हा कॉंग्रेसचा पाया आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉंग्रेसचा त्याग आहे. त्यामुळे जनतेला कॉंग्रेसचा इतिहास माहिती आहे. आज देशात जातीयवाद वाढला आहे, साहजिकच तेढ, द्वेष वाढला आहे. कॉंग्रेसला प्रेम भावना हवी आहे. त्यासाठी देशाचे नेते राहुल गांधी जनतेच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. मी स्वतः मानवतावाद मानतो आणि त्याच भावनेने सर्वांना मदत करतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने वाढले आहेत. कॉंग्रेसमध्ये सन्मान आहे, हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत उरण आणि माणगावच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला त्यावेळी बोलत होते.
शेलघर येथील ‘सुखकर्ता’ बंगल्यावर शुक्रवारी उरणचे शादाब शेख आणि माणगावचे सतीश टेंबे, तसेच अनेक कार्यकर्त्यांनी महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी स्वागत केले.यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष अखलाक शिलोत्री, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शहर अध्यक्ष गुफरान तुंगेकर,
उरण शहर महिला अध्यक्षा अफशा मुकरी,
उरण नगरपालिकेचे माजी नगरसेवक बबन कांबळे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे