pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय  मानवी तस्करी दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न    

0 1 7 4 1 0

जालना/प्रतिनिधी,दि.11

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना मार्फत दि.11  जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता परतुर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात राष्ट्रीय मानवी तस्करी दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

 शिबीरास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ,  मुख्याध्यापक संजय जाधव उपस्थित होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश वर्षा मोहिते यांनी पॉक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 या कायद्याबद्दल माहिती दिली. कायदेशीर प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक हल्ले, लैंगिक छळ आणि पॉर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासुन बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरिता लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 तयार करण्यात आला आहे. हा कायदा  तयार करतांना बालक प्रथम या तत्त्वाचा अंगीकार करण्यात आला असे त्यांनी सांगितले. बालकांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन घडल्यास त्याबाबत आपल्या जवळच्या व्यक्तीकडे त्वरीत सांगावे तसेच अशा व्यक्तीने तात्काळ त्याबाबतची माहिती पोलीसांना द्यावी असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्रणिता भारसाकडे-वाघ यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयामार्फत मोफत विधी सल्ला आणि मोफत वकील दिले जातात ही माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडीलांना व त्यांच्या इतर नातेवाईकांना द्यावी असे त्यांनी आवाहन केले तसेच स्त्री भ्रूण हत्या कायदायाविषयी त्यांनी उपस्थित विद्यार्थीनींना सांगितले तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ याचे महत्व सांगितले. असे सचिव, जिल्हा विधी  सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे