pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठवाडा रत्न व जालना रत्न गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवीण्याचे आवाहन

0 1 7 4 1 0
जालना/प्रतिनीधी,दि.9
कला क्रीडा दूत फाऊंडेशन महाराष्ट्र, स्वप्नपुर्ती सांस्कृतीक व क्रीडा मंडळ जालना व महा लोकाधिकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमीत्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मराठवाडा विभागातील व्यक्तींना मराठवाडा रत्न व मराठवाडा भुषण तसेच जालना जिल्ह्यातील व्यक्तींना जालना रत्न व जालना भुषण गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे आठवे वर्ष असुन दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सदर पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
राजकीय, सामाजीक, शैक्षणीक, वैद्यकीय, प्रशासकीय, उद्योग-व्यापार, पत्रकारीता, न्याय व विधी, कृषी, सहकार या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
प्रस्ताव पाठवितांना अर्जदारांनी स्वतःचा अल्प परीचय, कार्य अहवाल (फोटोज, पेपर कटींग, प्रमाणपत्र, सन्मानपत्र ई. झेरॉक्स प्रत) व कमीत कमी तिन प्रतिष्ठीत नागरिकांच्या शिफारशींसह 20 जानेवारी 2024 पर्यंत संपर्क कार्यालय एच.एम. कॉम्पलेक्स, रोहीला गल्ली कॉर्नर, कचेरी रोड, जुना जालना ता.जी. जालना 431213 येथे पाठवावेत किंवा प्रत्यक्ष जमा करावेत. पुरस्कारासाठी निवड झाली असेल किंवा झाली नसेल तरीही जमा केलेले कागदपत्रे कोणत्याही परिस्थीतीत परत केली जाणार नाहीत याची कृपया नोंद घेवुनच प्रस्ताव पाठवावा.
तसेच मराठवाड्यातील व जालना जिल्ह्यातील पत्रकार व जागरूक नागरिकांनीसुद्धा योग्य व्यक्तींची नावे संस्थेपर्यंत 9822456366 या नंबरवर व्हॉटस अपच्या माध्यमातुन पाठवावीत असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शेख चाँद पी.जे. व ईतर पदाधिकारी यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे