महिला आरोग्य परिसंवाद उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न —डाॕ.दिप्ती पोतदार,डाॕ.प्रज्ञा शिर्के,योगगुरु अर्चना सोनार यांचे उत्तम मार्गदर्शन.

पुणे/प्रतिनिधी,दि.17
एबीएसएसव्हीएसएस व स्त्रीशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “महिला आरोग्य परिसंवाद “पिंपरी चिंचवड,पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.त्यास या भागातील महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.या परिसंवाद मध्ये डाॕ.दिप्ती पोतदार,डाॕ.प्रज्ञा शिर्के यांनी स्त्रीयांचे विविध आजार व उपाय बाबत मार्गदर्शन केले.तर योगगुरु अर्चना सोनार यांनीही योगाबद्दल माहिती दिली.
अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान व स्त्रीशक्ती फाउंडेशन संचलित महिला विकास समिती ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्युनिटी हाॕल’,शिवाजी पार्क ,पिंपरी चिंचवड ,पुणे येथे महिलांच्या आरोग्यासाठी “महिला परिसंवाद “या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या परिसंवादामध्ये डाॕ.दिप्ती पोतदार,डाॕ.प्रज्ञा शिर्के यांनी सहभाग घेऊन महिलांना मार्गदर्शन केले.तर डाॕ.अदिती उंबरकर यांनी या कार्याक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.प्रामुख्याने या परिसंवादामध्ये पोश्चर थेरपी म्हणजे काय ?याबाबत विशेष मार्गदर्शन ,मणक्याचे आजार ,ब्रेस्ट कॕन्सर कसा समजावा तसेच कॕन्सरचे निदान लवकर करता येते का ?.तसेच स्त्रीयांचे विविध आजार व घ्यावयाची काळजी याबाबत डाॕ.दिप्ती पोतदार व डाॕ.प्रज्ञा शिर्के यांनी महिलांनी उत्स्फुर्तपणे विचारलेल्या प्रश्नांचे मार्गदर्शनपर उत्तर दिले.व त्यांचे शंका समाधान केले. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सदिच्छापर मनोगतही व्यक्त केले.तसेच स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना सोनार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातुन दिला.विविध संस्थेचे प्रकल्प समन्वयक व रुग्वेद सुवर्णवार्ताचे सहसंचालकआत्माराम ढेकळे यांनीही महिला परिसंवाद मुळे आरोग्याची जाणीव जागृती होते.अशा कार्यक्रम आयोजनाची समाजात अत्यंत गरज असल्याचे मनोगत व्यक्त करतांना व्यक्त केले. या कार्यक्रमाचा आधिक प्रचार प्रसार व्हावा या हेतुने रुग्वेद सुवर्णवार्ता प्रसार वाहिनी मार्फत संचालक दिनेश येवले यांनी थेट प्रेक्षपण करुन कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रयत्न केले.तर या थेट प्रेक्षपण कार्यक्रमाचे चित्रीकरण कुणाल डोंगरे यांनी केले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश,संत गजानन महाराज व संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन ,दीप प्रज्वलन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.रेखा महिंद्रकर व सौ.कल्पना पाटील यांनी केले.उपस्थित महिलामधुन सौ.श्रुती देसाई व सौ.वैशाली जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.शेवटी सौ.नीता डोंगरे यांनी आभार प्रदर्शन केले.