pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वशेणी येथे जनसेवा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

0 1 7 4 1 1

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28

जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त शिष्यवृत्ती आणि एन एम एम एस परिक्षा आठवीत पात्र ठरलेल्या मुलींचा सन्मान करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वशेणीस ऑफीस स्टेशनरी साहित्याची भेट देण्यात आली.तर 12 वीच्या गरजू मुलींना पुस्तक व वह्यांचा संच वाटप करण्यात आला.वशेणी गावाची सेवा करणा-या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना जनसेवा पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले.

जनसेवा पुरस्कार प्राप्त मान्यवर:-
श्री.तुकाराम परशुराम म्हात्रे (जीवनगौरव सेवाभावी पुरस्कार),
श्री.एकनाथ शांताराम म्हात्रे
(भजन सेवा पुरस्कार),
श्री.लवेश दामोदर म्हात्रे (पर्यावरण प्रेमी पुरस्कार),
श्री.नंदकुमार मदन गावंड (बालसंस्कार पुरस्कार),
श्री.अविनाश बळीराम पाटील
(अध्यात्मिक पुरस्कार),
श्री.रविंद्र नामदेव खोत
(आरोग्य सेवा पुरस्कार),
श्री.भक्तीकुमार हरिश्चंद्र ठाकूर
(श्रवण भक्ती पुरस्कार),
श्री.प्रविण विष्णू ठाकूर
(उत्कृष्ट समालोचन पुरस्कार)

विशेष सन्मान पुरस्कार:-
सौ.शर्मिला महेंद्र गावंड- पिरकोन
(शैक्षणिक व्हीडीओ च्या माध्यमातून अध्ययन अध्यापन),
श्री.रमेश अर्जुन पाटील – केळवणे
(शिष्यवृत्ती मोफत मार्गदर्शन),
श्री.नारायण शंकर पाटील – पुनाडे
(गणिताचा गाव संकल्पना),
श्री.तुषार चंद्रकांत म्हात्रे – पिरकोन
(ऐतिहासिक संशोधन).

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी मंडळाच्या उपक्रमांचा आढावा सादर केला. यावेळेस जगणे साधे सोपे सुंदर होण्या साठी माणसाने मनातील कचरा बाहेर काढून तो डसबीन मध्ये टाकायला हवा या साठीच सर्व गौरवप्राप्त मान्यवरांना डसबीन ची सप्रेम भेट मंडळाकडून देण्यात आली आहे.असे मत मांडले.

सदर कार्यक्रमास उरण पंचायत समिती माजी सभापती समिधा निलेश म्हात्रे, डी .वाय. एफ.आय.चे सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे,रयत शिक्षण संस्थेचे कौन्सिल सदस्य प्रा.डि.बी.पाटील, सामाजिक कार्यकर्ते निलेश भरत म्हात्रे, गावचे उप सरपंच जयवंत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल ठाकूर, संग्राम पाटील,प्रिती पाटील, अस्मिता पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता म्हात्रे,मूर्तीकार जे.डी.म्हात्रे, सदाशिव पाटील,बळीराम म्हात्रे, देविदास पाटील पुरण पाटील,रमाकांत पाटील, वामन म्हात्रे,आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी उरणच्या माजी सभापती समिधा म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून अगदी कमी बजेट मध्ये जन सेवेचा आनंद देणारे एकमेव मंडळ म्हणजे वशेणी इतिहास संपादकीय मंडळ असे गौरवोदगार काढले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन बी.जे.म्हात्रे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश पाटील,विश्वास पाटील,डाॅक्टर रविंद्र गावंड, पुरूषोत्तम पाटील, अनंत तांडेल,गणपत ठाकूर, हरेश्वर पाटील,कैलास पाटील, अनंत पाटील,संजय पाटील,हरिश्चंद्र ठाकूर, गणेश खोत , संदेश गावंड ,मनोज गावंड आदींनी मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे