निवडणुकी आधीच सुरेश पाटलांचा घेतला जातोय आष्टी विधानसभेत धसका
अनेकांना बॅलेटपेपर मध्ये आपले नाव येईल का नाही यांचीच भिती ?

पाटोदा /प्रतिनिधी,दि.20
विधानसभा निवडणुकांचे पडघम जसे वाजु लागले तसा आष्टी विधानसभा मतदार संघात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील समर्थक तथा समाजसेवक सुरेश पाटील नावाची धसकी अनेकांनी घेतल्याचे आणि वंशपरंपरागत आपलीच मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधीनी घेतल्याचे बघायला मिळत आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर हा बीड जिल्ह्यातील महत्त्वाचा व मोठा विधानसभा मतदार संघ मानला जातो, परंतु महत्त्वाचा जरी मतदार संघ असला, तरी या मतदार संघाचा विकास करण्यासाठी आजपर्यंतचे निवडूण दिलेले आमदार मात्र स्वतःचाच व नातेवाईकांचा विकास म्हणजे मतदार संघाचा विकास हेच ब्रिदवाक्य घेऊन काम करत आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकी मध्ये मतदार राजा आता बराचसा सुज्ञ झालेला दिसुन येतो आहे. कारण आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत यांचा चांगलाच प्रत्यय आला आहे. वंशपरंपरागत राजकारण्यांच्या आणि घराणेशाहीच्या राजकारणाला सुरंग लावुन अबाधित समजल्या जाणाऱ्या सत्तेच्या माजाला याच मतदार संघाने सुरुंग लावण्याचे काम केलेले आहे. या विधानसभा निवडणुकीत आष्टी -पाटोदा – शिरूर मतदार संघात सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील हे निष्कलंक, उच्च शिक्षित उमेदवार आजपर्यंतच्या सत्ता भोगणाऱ्या आणि वंशपरंपरागत समजल्या जाणाऱ्या राजकारण्यांच्या सत्तेला सुरुंग लावुन सर्वसामान्य नागरिकांचा आमदार होऊन आमच्या आष्टी-पाटोदा- शिरूर मतदार संघाचा विकासाचा अनुशेष भरुन काढुन आमच्या तिन्ही तालुक्याला सुजलाम सुफलाम करतील हा विश्वास आता दस्तुरखुद्द मतदार राजाला असल्यामुळे समाजसेवक सुरेश पाटील या नावाचा धसकी आत्तापासुनच सत्ताधारी आजी माजी आमदार आणि वंशपरंपरागत नेत्यांनी घेतली आहे. शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे समजताच काहींना तर आत्तापासुनच बँलेट पेपर मध्ये माझे नाव असेल कि नाही या गोष्टीची धसकी लागली आहे. सध्या आष्टी-पाटोदा-शिरूर या मतदार संघातल्या मतदारांनी एका निश्चयाने मतदान करुन योग्य अशा शिक्षीत,अभ्यासु आणि तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या लोकप्रतिनिधीलाच निवडुन देणार असल्याचा निर्धार केल्यामुळे समाजसेवक सुरेश पाटील यांचे नाव सध्या गाव,वाडी,वस्ती, आणी शहरी भागात चर्चीले जात आहे. सत्ता भोगुन आपल्याच झोळया भरुन जनतेला कंगाल करणाऱ्या व सत्तेच्या खुर्चीला आपल्या बापाची जहांगीरी समजणार्या नेत्यांना यंदाच्या विधानसभेत त्यांची जागा दाखवुन देण्याची वेळ आता आली असुन,आता मतदान विकासाची दुरदृष्टी असलेल्या सुरेश पाटलांनाच देणार आणि विजयी सुध्दा करणार असल्याची चर्चा आष्टी-पाटोदा-शिरूर या मतदार संघातील जनतेत आतापासूनच सुरू आहे.