pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सफाई कर्मचारी व त्यांचे पुर्नवसन कायद्याअंतर्गत कार्यशाळा संपन्न

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि. 28

सामाजिक न्याय समता पर्व अभियानाअंतर्गत विभागाच्या विविध योजनांचा थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. समाज कल्याण कार्यालय व नगर परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचारी व त्यांचे पुर्नवसन कायदा 2013 अंतर्गत जनजागृती कार्यशाळा दि.27 एप्रिल 2023 रोजी जालना येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर टाऊन हॉलमध्ये संपन्न झाली.
या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, विधीज्ञ ज्ञानेश्वर शेंडगे, सफाई कर्मचारी आंदोलन जिल्हा समन्वयक सिध्दार्थ इंगळे, सहाय्यक आयुक्त अमित घवले, मुख्याध्यापक एम.डी.गिरी यांची उपस्थिती होती. कार्यशाळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे, सहाय्यक आयुक्त अमित घवले, विधीज्ञ ज्ञानेश्वर शेंडगे, जिल्हा समन्वयक सिध्दार्थ इंगळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्द देवून सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेस जालना नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सहभाग घेतला. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2