pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वृक्षलागवडीसाठी रोपे निर्मिती मोहिमेत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उत्स्फुर्तपणे श्रमदान…!

पर्यावरण रक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रोपे निर्मितीची मोहिम  

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि. 12

पर्यावरणाच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होणे आवश्यक आहे, ही निसर्गाप्रती असणारी सामाजिक दायित्वाची भावना लक्षात घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रोपे निर्मिती करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे हातभार लावला. स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनीही रोपे निर्मिती मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविला.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून यंदा मोठया प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी  “हर घर नर्सरी”  हा  उपक्रम जालना जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने  या उपक्रमात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कृतीशील सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रजातींची जास्तजास्तीत वृक्षलागवड होईल याकरीता रोपांची निर्मीती करण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकारी-कर्मचारी आज तत्परतेने रोपे निर्मिती मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी झाले.

रोपे निर्मीती करण्यासाठी पिशव्या व काळी माती तसेच स्थानिक प्रजातींचे बी व कलमे उपलब्ध करुन देण्यात आले होते. पिशव्यामध्ये माती भरुन त्यामध्ये बिज रोवण्याचे काम अगदी आनंदाने व उत्साहाने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे