जालना/प्रतिनिधी,दि.23
राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार नारायणराव पैठणकर गुरूजी यांचे आज (दि.२३) मंगळवारी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या दि. २४ मे, रोजी सकाळी १० वाजता भोकरदन येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत. दैनिक पुण्यनगरीचे भोकरदन तालुका प्रतिनिधी संजय पैठणकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात भाऊ कडुबा पैठणकर, मुले संजय व राजेंद्र पैठणकर, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.