pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय लोकअदालतीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी,दि. 21

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन. आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची  वसूली प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची  प्रकरणे, इलेक्ट्रीसिटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व तर प्रकरणे तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणे, इत्यादी प्रकरणासाठी दि. 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.   तरी सर्व संबंधितांनी या संधीचा लाभ घेवून आपली प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन श्रीमती पी.पी.भारसाकडे-वाघ, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *