pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

 जालना शहरात रंगणार खो खो चा थरार

जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन

0 1 7 4 0 8
जालना/प्रतिनिधी,दि.22
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या वतीने जालना जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन दिनांक 23 व 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची) रेल्वे स्टेशन रोड याठिकाणी करण्यात आले आहे.
       सदर स्पर्धा 14 वर्ष आतील मुले व मुली यांच्या गटात होणार असून महाराष्ट्र राज्यातून आठही क्रीडा विभागाचे मुला मुलींचे संघ जवळपास 300 खेळाडू व प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच सहभागी होणार आहेत. याच स्पर्धेतून राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे.
    जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडू यांना टीशर्ट व कॅप तसेच प्रथम येणाऱ्या तीन संघांना स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी मार्च पास व इतर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
       स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा .  जिल्हाधिकारी  डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मा . उपसंचालक , क्रीडा व युवक सेवा , छत्रपती संभाजी नगर श्री संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा कार्यालयाचे खो खो मार्गदर्शक तथा तालुका क्रीडा अधिकारी श्री संतोष वाबळे , क्रीडा मार्गदर्शक श्री शेख मोहम्मद, क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा परदेसी, जिल्हा खो खो संघटनेचे सचिव डॉ. शेख रफिक तसेच सदर स्पर्धेकरिता स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांचे पदाधिकारी व जिल्हा संघटक परिश्रम घेत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे