साई नगर सिडकोतील लाभेश हनुमान मंदिरात ह.भ.प.नारायणगिरी महाराज यांच्या कीर्तनाने हरीनाम सप्ताहाची सांगता
छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.20
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सिडको साईनगरातील लाभेश हनुमान मंदिर येथे दि. 13 एप्रिल पासून सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये आज (दि. 20)संत तुकाराम महाराज साधकाश्रम सावखेड येथील ह.भ.प.प्रेममुर्ती गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या काल्याचे किर्तनाने सप्ताहाची झाली.
महाराजानी संत तुकाराम महाराज यांच्या –
हरिनें माझें हरिलें चित्त ।
भार वित्त विसरलें ॥१॥
आतां कैसी जाऊं घरा ।
नव्हे बरा लौकिक ॥ध्रु.॥
पारखियांसी सांगतां गोटी । घरची कुटी खातील ॥२॥
तुका म्हणे निवांत राहीं ।
पाहिलें पाहीं धणीवरि ॥३॥
या अभंगावर कीर्तन करताना सांगितले की ज्याच्या पोटात अनंत ब्रम्हांडे आहेत, असा तो व्यापक श्रीहरी नंदाच्या घरी बाल रूपाने त्यांने जन्म घेतलेला आहे.
हे केवढ आश्चर्य आहे देवाच्या लीला कोणात्याही सर्व सामान्य माणसाला कळत नाही
जो सर्व जगाला तृप्त करतो त्याला यशोदा माता जेऊ घालते
एवढेच नाहीत तर जो कमळापती आहे विश्वाला व्यापणारा आहे त्या बालक कृष्णाने गवळणी चे चित्त हरले आहे.असे महाराजांनी आपल्या कीर्तनतून सांगितले.
या सप्ताहात ह.भ.प.रामेश्वर महाराज शिंदे यांनी शिवमहा पुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक ह.भ.प.संतोष महाराज सवई, तसेच मृदंगमणी
ह.भ.प.भागवत महाराज गोराडे, ह.भ.प. प्रसाद महाराज बोर्डीकर, ह.भ.प.विष्णू महाराज गायकवाड, भागवताचार्य ह.भ.प.श्रीराम महाराज पाटील, ह.भ.प.अर्जुनगिरी महाराज, स्वामी अरुणनाथगिरी महाराज ह.भ.प.बाळू महाराज गिरगांवकर यांची हरिकीर्तन झाली.
काल्याच्या कीर्तनांनंतर भक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले.परिसरातील भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सप्ताह समितीचे पदाधिकारी व सदस्य व साई नगरातील पुरुष, महिलातरुण मुले, मुली यांनी प्रयत्न केले.