pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांची युनायटेड ग्लोबल फेडरेशनचे चेअरमन दुर्गेश विष्णू बनकर , मॅनेजिंग डायरेक्टर ज्ञानेश्वर शास्त्री सुसार, समाधान नवले यांच्या सोबत सोबत बैठक विविध सामाजिक उपक्रमांवर सविस्तर चर्चा

0 4 0 8 5 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.21

सामाजिक कार्यात नेहमीच सहकार्यशील असलेल्या जालना जिल्हाधिकारी मा. अशिमा मित्तल (कलेक्टर मॅडम) यांची युनायटेड ग्लोबल फेडरेशनच्या प्रतिनिधींनी सौजन्य भेट घेऊन संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा केली.

या भेटीत संस्थेने आजपर्यंत राबवलेल्या शाळा दत्ता प्रकल्प, शैक्षणिक साहित्य वितरण, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, पर्यावरण, प्राणी बचाव,तसेच ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी मॅडम यांना देण्यात आली.

भविष्यात जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणते नवीन प्रकल्प राबवता येतील, याबाबतही विस्तृत विचारमंथन करण्यात आले. जिल्हाधिकारी मॅडम यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. यामुळे संस्थेच्या सामाजिक कार्याला पुढील दिशा मिळणार असल्याचे फेडरेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले.

युनायटेड ग्लोबल फेडरेशनने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आगामी काळात अधिक प्रभावी आणि उपयुक्त उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. युनायटेड ग्लोबल फेडरेशन ही संस्था पूर्ण भारत भर कार्यरत आहे परंतु संस्थे चे हेड ऑफिस हे जिल्हा इथे आहे जालना जिल्ह्याच्या प्रगतीसाठी संस्था सातत्याने कार्यरत राहणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे