pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि.12

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी हुदा उर्दु प्राथमिक विद्यालय, जालना येथे राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
शिबीर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ, मुख्याध्यापक उबेद अब्दुल रहेमान सिद्दिकी उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी उपस्थित विद्यार्थांना त्यांना समजेल अशा सोप्या शब्दात लैंगिक गुन्ह्यांपासुन बालकांचे संरक्षण कायदा समजावुन सांगितला. तसेच सदर कायद्यामध्ये शिक्षेचे प्रावधान आणि विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच याबाबत सांगितले. तसेच मुलींच्या विविध प्रश्नांबाबत एक कमिटी स्थापन करण्याचे निर्देश दिले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रणिता भारसाकडे-वाघ यांनी आपला न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले. मनामध्ये इच्छाशक्ती असली की आपण कोणत्याही पदापर्यंत पोहचु शकतो तसेच कोणत्याही गोष्टीला अगदी मनापासुन मिळवण्याचा ठरवलं तर ती गोष्ट ते ध्येय आपल्याला साध्य होवू शकते. तसेच विदयार्थ्यांना अभ्यास करतांना मोबाईल जवळ नाही ठेवला पाहिजे सर्व मन एकाग्र करून अभ्यास केला पाहिजे तसेच आयुष्याच्या वाटेवर कितीही कठीण प्रसंग आला तर त्याला तोंड देवून आपण आपल्या आयुष्यात पुढे गेले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना चॉकलेटस वाटप करण्यात आले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2