ब्रेकिंग
मयूर सुतार यांच्या पुढाकाराने शिवराय चौक द्रोणागिरी येथे बसविण्यात आले गतिरोधक.

0
3
2
1
6
5
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
सतत होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी शिवराय चौक द्रोणागिरी सेक्टर ४७, नवीन शेवा येथे गतिरोधक बसविण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा अध्यक्ष मयूर सुतार यांनी सिडकोकडे केली होती.यासाठी लागणारी पोलीस परवानगी डीसीपी, ट्रॅफिक परवानगी साठी मयूर सुतार यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या पाठपुराव्याला आता यश आले असून अखेर सिडकोकडून गतिरोधक बसविण्यात आले.जनतेसाठी सतत विकासात्मक कामे करणाऱ्या मयूर सुतार यांनी केलेल्या गतिरोधक कामामुळे सर्व जनतेनी त्यांचे अभिनंदन करत या समाजोपयोगी कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.
0
3
2
1
6
5