शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जालना
विधानसभा संघटक दीपक रणनवरे यांनी ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ शासनाने स्थापन करावे. या प्रमुख मागणीसह अनेक प्रलंबित मागण्याकरिता जालना शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दोन वेळा उपोषण केले. त्यांच्या या उपोषण आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी भगवान परशुराम आर्थिक
विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे दीपक रणनवरे यांनी उभारलेल्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले.त्यानिमित्त जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख हरीहर शिंदे, माजी सभापती मुरलीधर थेटे, देवनाथ जाधव, माजी जि.प. सदस्य बबनराव
खरात, अशोक खलसे, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले,उपतालुकाप्रमुख प्रभाकर उगले, प्रभाकर घडलिंग,बाबुराव
कायंदे, सुरेश वाघमारे, युवासेनेचे संदीप मगर, हरी शेळके, संतोष खरात,अंकुशराव राजेजाधव, अर्जुन शेवाळे, संदीप मगर यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.