विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था पाटोदा ची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

पाटोदा/नितिन भोंडवे,दि.24
पाटोदा विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील कुंडलिकराव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
पतसंस्थेच्या वार्षिक सभा विद्युत सहकार भवन पाटोदा येथे संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पी बी राख, संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन गायकवाड, अध्यक्ष राष्ट्रवादी पतसंस्था बीड संजय चव्हाण. आर व्ही जाधव, पांडे साहेब साईनाथ राऊत अभिषेक गायकवाड, फड साहेब सौ.चव्हाण मॅडम, शिंदे मॅडम, ढवळे मॅडम, डोईफोडे साहेब आप्पा जानवळे, पंकज मिसाळ, सांगोळे साहेब, मुंडे साहेब, विकी वाघमारे, तावरे साहेब, बांगर साहेब,केदार साहेब,खेडकर साहेब व सर्व सभासद हजर होते.
प्रमुख पाहुणे श्री राख साहेब सचिन गायकवाड व आर व्ही जाधव साहेब यांनी आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले
तसेच अध्यक्षीय भाषणात श्री सुनील वाघमारे यांनी पतसंस्थेचा लेखाजोखा मांडला व पतसंस्थेची कर्ज मर्यादा दहा लाखावरून बारा लाख व तातडी कर्ज पन्नास हजाराहून एक लाख रुपये तसेच शैक्षणिक कर्ज 20 हजाराहून पन्नास हजार करण्याचे आश्वासन दिले तसेच लेखापरीक्षक श्री तांबे साहेब यांनी संस्थेस अँडीट वर्ग अ दिल्याबद्दल त्यांचेपतसंस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ श्री प्रभाकर येडे उपाध्यक्ष सतीश गोरे खजिनदार शेख जाफरभाई विठ्ठल भाकरे राजू पठाण शहाजी नाईकवाडे हनुमंत धुमाळ रमेश बोबडे दत्ता भोंडवे श्रीराम कुमरे संदिपान अनपट सौ रेखा सानप सौ दीप्ती गाडेकर व्यवस्थापक श्री व्ही टी नायकवडे संगणक ऑपरेटर श्री शेख माजेद
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ह भ प नामदेव गिरी महाराज यांनी केले व संस्थेचे सचिव श्री प्रभू जाधवर यांनी प्रास्ताविक केले व आभार प्रदर्शन श्री शेख मुजमील तज्ञ संचालक यांनी केले. सभा खेळी मेळी च्या वातावरणात संपन्न झाली.